Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेणापूर बाजार समिती लातूरप्रमाणे विकसित करणार

रेणापूर प्रतिनिधी- रेणापूर हा कृषीप्रधान तालुका असून शेतकरी प्रयोगशील आणि कष्टाळू आहेत. त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळावे म्हणून नव्याने स्थापन

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखून योगदान द्यावे-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
जळगावमध्ये कंटेनर उलटल्याने दोघांचा मृत्यू
माणिक मेटकर जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त

रेणापूर प्रतिनिधी- रेणापूर हा कृषीप्रधान तालुका असून शेतकरी प्रयोगशील आणि कष्टाळू आहेत. त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळावे म्हणून नव्याने स्थापन झालेल्या रेणापूर बाजार समितीमध्ये कृषी उत्पादनाला अधिकाधिक भाव मिळवून देण्याचे प्रयत्न मागच्या कार्यकाळात पदाधिका-यानी केले आहेत. लातूर प्रमाणेच रेणापूर बाजार समितीमध्येही सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा आणि अद्ययावत यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. यातील काही कामे झाली आहेत, आगामी काळात उर्वरित कामेही गतीने पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी येणा-या निवडणुकीत कृषी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
रेणापूर कृषि उत्पन्न बाजार समिती 2023 निवडणुकीच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी आयोजीत करण्यात आलेल्या मतदारांच्या संवाद मेळाव्यात रेणापूर येथे ते बोलत होते मंचावर लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंंदे, माजी आमदार अ‍ॅड त्र्यंबक भिसे, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख आदी उपस्थित होते. आमदार अमित देशमुख म्हणाले की, रेणापूर तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी रेणा कारखान्याची उभारणी करून तो यशस्वीपणे चालविण्यात येत आहे. येथील कापूस उत्पादकांची सोय व्हावी म्हणून पानगाव येथे कापूस खरेदी केंद्र प्रयत्नपूर्वक चालू केले होते, त्या ठिकाणी आता कायमस्वरूपी गोडाऊन व अन्य सुविधा उभारण्यात येणार आहेत शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम सातत्याने सुरु आहे. आगामी काळातही पुढे चालूच राहील असे ते म्हणाले. या संवाद मेळाव्यास रेणापूर तालुक्यातील सरपंच सोसायटीचे चेअरमन सदस्य काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बाजार समितीचे माजी सभापती माजी संचालक, कृषी विकास पॅनलचे उमेदवार उपस्थित होते. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार अ‍ॅड त्र्यंबक भिसे, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक सर्जेराव मोरे यांनी केल. सुत्रसंचलन संचालक अनिल कुटवाड यांनी तर आभार रमेश सूर्यवंशी यांनी मानले.

COMMENTS