Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांना मिळेनात बेड ; एका खाटेवर दोन रुग्ण

2020 मध्ये जेव्हा जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरू होता, तेव्हाही महाराष्ट्रात उद्भवली नव्हती, अशी परिस्थिती आता उद्भवली आहे. दररोज कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ होऊ लागली आहे.

 सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा ः संधान
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दरवर्षीप्रमाणे सोयगाव तालुक्यातील बंजारा समाज बांधवांसोबत केली होळी-रंगपंचमी 
धनलक्ष्मी शाळेत शिवजयंतीनिमित्त दुमदुमला शिवरायांचा जयजयकार

मुंबई/प्रतिनिधी : 2020 मध्ये जेव्हा जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरू होता, तेव्हाही महाराष्ट्रात उद्भवली नव्हती, अशी परिस्थिती आता उद्भवली आहे. दररोज कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ होऊ लागली आहे. मध्यंतरी रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने बंद केलेले कोविड सेंटर आता पुन्हा सुरू करण्यात येत असले, तरी बर्‍याच ठिकाणी रुग्णांच्या नातेवाइकांना बेड मिळण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. 

औरंगाबादमध्ये रुग्णांना बेड मिळवण्यासाठी तास न तास वाट पाहावी लागत आहे.  हॉस्पिटलचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. काही रुग्णांच्या पदरी निराशाच येत आहे. दुसरीकडे सरकारी रुग्णालयात औषधे नाहीत, म्हणून गरीबांना स्वत:च्या वस्तू विकून औषधोपचार करावे लागत आहेत. जागा आणि औषधांची कमतरता असल्याचे औरंगाबादच्या पालकमंत्र्यांनी मान्य केले आहे. उपराजधानी नागपुरातील स्थिती वेगळी नाही. शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात एका बेडवर दोन रुग्णांना ठेवण्यात आलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांनाही एकाच बेडवर झोपवण्यात आले आहे. महापालिका मात्र बेड्स उपलब्ध असल्याचा दावा करते आहे. नागपुरात सध्या 80 टक्के बेड्स भरले आहेत, तर व्हेंटिलेटरचे 70 टक्के बेडही भरले आहेत. औरंगाबादमध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त बेड्स भरले आहेत. ठाण्यात जवळजवळ 70 टक्के बेड्स फुल झाले आहेत. जळगावात 50 ते 65 टक्के बेड्स भरले आहेत. देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पुण्यात तर 90 टक्के बेड्स भरले आहेत. राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात ही स्थिती आहे. एकीकडे बेड्स आणि औषधांची कमतरता जाणवत असताना रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. तेव्हा लवकरच जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे ठाकरे सरकारसमोर सध्याच्या घडीचे मोठे आव्हान आहे.

COMMENTS