मुंबई प्रतिनिधी- जगभरात रोड अपघातामुळे होण्याऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. भारतातही दरवर्षी सुमारे दीड लाख लोक रोड अपघातामुळे मरण पावतात. त्याम
मुंबई प्रतिनिधी- जगभरात रोड अपघातामुळे होण्याऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. भारतातही दरवर्षी सुमारे दीड लाख लोक रोड अपघातामुळे मरण पावतात. त्यामुळे रोड सेफ्टी अर्थात रस्ता सुरक्षा हा चिंतेचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे. अपघातांची अनेक कारणं असतात. कधी चालकांचा बेशिस्तपणा तर कधी रस्त्यांची दुरवस्था प्रामुख्यानं अपघातांना कारणीभूत ठरते. मात्र, वाहनांना असलेले विविध प्रकारचे आरसेदेखील अपघातांना कारणीभूत ठरू शकतात, असं मत महाराष्ट्रातील एका एका स्वयंसेवी संस्थेनं मांडलं आहे. मुंबईतील वॉचडॉग फाउंडेशन या एनजीओनं मुख्यमंत्री आणि राज्य परिवहन अधिकाऱ्यांकडे याचिका दिली आहे. याबाबत एनजीओचे वकील गॉडफ्रे पिमेंटा हे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या याचिका पत्रामध्ये म्हणालंय की, “बहुतेक पुरुष ऑटो रिक्षाचालक रिअर-व्ह्यु मिररमधून त्यांच्याकडे (प्रवासी महिलेला एकटक) बघतात. त्यामुळे महिलांना अवघडल्यासारखं होतं. सतत आरशात बघितल्यामुळे ड्रायव्हरचं लक्ष विचलित होऊन अपघात होण्याचीही शक्यता असते. ही बाब काही महिला प्रवाशांनी एनजीओच्या निदर्शनास आणून दिली आहे.”
COMMENTS