Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आष्टी शहरात सावतामाळी सप्ताह भव्यदिव्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत-अजय धोंडे

आष्टी प्रतिनिधी - आष्टी शहरातील भाजीमंडई जवळ असलेल्या संत सावतामाळी मंदिरात संत सावतामाळी आणि संत नामदेव महाराज यांचा संयुक्त अखंड हरिनाम सप्ताह

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी ची हजेरी !
उत्तरप्रदेशातील गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काऊंटर
सा.बा.ठाणे मंडळांतर्गत झालेल्या गैरव्यवहाराची एसीबी चौकशी करा

आष्टी प्रतिनिधी – आष्टी शहरातील भाजीमंडई जवळ असलेल्या संत सावतामाळी मंदिरात संत सावतामाळी आणि संत नामदेव महाराज यांचा संयुक्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायीक पारायण सोहळा नुकताच संपन्न झाला आहे.हा सप्ताह दरवर्षी वाढत वाढत आहे.आणखी व्यापकता व भव्यता होण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया.आष्टी शहरात सावतामाळी सप्ताह भव्यदिव्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे युवानेते अजयदादा धोंडे यांनी आवाहन केले.यावेळी दिनकरराव तांदळे,अनंत हंबर्डे सर यांचे मनोगत झाले.
यावेळी अजयदादा धोंडे,अनंत हंबर्डे, दिनकरराव तांदळे महाराज,बलभीम सुंबरे,प्रा.वसंतराव देशमुख,संपतराव धोंडे,नगरसेवक ज्ञानदेव राऊत, नगरसेवक अक्षय धोंडे (आमदार) ,पत्रकार उत्तम बोडखे, रघुनाथ महाराज शेळके, दत्ताभाऊ बोडखे,बाळासाहेब मुळे,तुकाराम भोसले महाराज, किशोर भोपळे,नानासाहेब तवले,भोगाडे, गोटीराम धोंडे,सुरेश धोंडे,शिवदास केरुळकर,ह.भ.प.सुरेश महाराज डोमकावळे, ह.भ.प.लाला महाराज राक्षे,ह.भ.प.राजाराम महाराज बोडखे,ह.भ.प.सोनाजी बोडखे,शरद गर्जे,ग्यानदेव धोंडे आदि मान्यवर उपस्थित होते.  या सप्ताहात काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण,ज्ञानेश्वरी पारायण,संतकथा,हरिपाठ,  हरिकीर्तन व हरिजागर आदि धार्मिक कार्यक्रम झाले.हरिपाठ नेतृत्व ह.भ.प.सुरेश महाराज डोमकावळे,ह.भ.प.लाला महाराज राक्षे, ह.भ.प.राजाराम महाराज बोडखे, ह.भ.प.सोनाजी बोडखे यांनी केले तर मार्गदर्शक म्हणुन ह.भ.प.रामदास डोरले महाराज,ह.भ.प. बाळासाहेब महाराज झगडे हे होते.या सप्ताहात ह.भ.प. बाळु महाराज झगडे,ह.भ.प.पुष्पाताई महाराज जगताप,ह.भ.प. शिवाजी महाराज कोकणे,ह.भ.प. आदिनाथ महाराज दानवे (सर), ह.भ.प.श्रीहरि पुरी महाराज,ह.भ.प.गणेश महाराज सुडके यांचे कीर्तन झाले. दि.27 जुलै रोजी दुपारी दिंडी प्रदक्षिणा आणि मिरवणुक झाली.गुरुवारी रोजी सकाळी 10 ते 12 यावेळात ह.भ.प.रामदास डोरले महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले.  त्यानंतर महाप्रसाद वाटपाने सप्ताहाची सांगता झाली आहे. सप्ताह यशस्वी करण्यासाठी  सावता सेवा मंडळाने परीश्रम घेतले.

COMMENTS