रेल्वेस्थानकात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वेस्थानकात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरातील रेल्वे स्थानकात 40 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना शनिवारी (दि.5 ) सकाळी साडे नऊ वाजता निदर्शनास आली. द

कृषि विद्यापीठाचे कुलगुरु पाटील गोपालकाच्या भेटीला
याची देही याची डोळा ऐसा अनुभवला शिर्डी परिक्रमेचा सोहळा
महालक्ष्मी’ हॉस्पिटलमधील आयसीयु सेंटरने मिळणार जीवदान : डॉ.तोरडमल

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरातील रेल्वे स्थानकात 40 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना शनिवारी (दि.5 ) सकाळी साडे नऊ वाजता निदर्शनास आली. दरम्यान, या व्यक्तीचे यकृत खराब झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे प्रयत्न रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. मृत व्यक्ती अंगाने मध्यम, रंगाने गहूवर्ण असून उंची 173 सेमी आहे. डोक्याचे केस वाढलेले, नाक सरळ, डोळे घारे, अंगात राखाडी हिरवट टी शर्ट, लालसर काळी फुलपँट, लाल रंगाचा करदोरा आहे. या व्यक्तीबद्दल कोणाला काही माहिती असल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अधिकारी तथा पोलिस हवालदार सी. एल. देशमुख यांनी केले आहे.

COMMENTS