Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

60 हजार जुन्या इमारतींमधील रहिवाशांना दिलासा

पुणे : इमारतीचा पुनर्विकास करून नवीन इमारत उभारल्यानंतर मूळ सदनिकाधारकांना पुन्हा मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही, असा आदेश मुंबई उच्च न्यायालया

पुण्यात 40 टक्के सवलतीसाठी मिळकतींचे होणार सर्वेक्षण
नवोदय परीक्षेत श्रुतिका झगडेची निवड
पुण्याचा गोल्डन बॉय गाजवणार बिग बॉस

पुणे : इमारतीचा पुनर्विकास करून नवीन इमारत उभारल्यानंतर मूळ सदनिकाधारकांना पुन्हा मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील पुनर्विकासाला आलेल्या तब्बल 60 हजार इमारतींमधील रहिवाशांना दिलासा मिळाला असून पुनर्विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासामध्ये मूळ सभासदांना बांधकाम व्यावसायिकाकडून देण्यात येणार्‍या सदनिकेच्या क्षेत्राच्या बांधकाम खर्चावर मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पुनर्विकासात मिळालेल्या सदनिकेच्या क्षेत्राव्यतिरिक्त सभासदाने वाढीव क्षेत्र वैयक्तिकरीत्या घेतल्यास त्यासाठी चालू बाजार मूल्यदरानुसार (रेडीरेकनर) मुद्रांक शुल्क घेण्याचीही सूचना करण्यात आली होती. मूळ रहिवाशांकडून नव्या घरांची विकासक कंपनीकडून खरेदी होत नसते. ती त्यांना पुनर्विकास योजनेंतर्गत मोफत मिळतात. त्यामुळे त्यांना पुन्हा मुद्रांक शुल्क लागू होत नाही, असे सांगत न्यायालयाने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची 23 जून 2015 आणि 30 मार्च 2017 रोजी प्रसृत केलेली परिपत्रके रद्द केली आहेत. दरम्यान, राज्यात एक लाख 20 हजार गृहनिर्माण सोसायट्या, तर एक लाख अपार्टमेंट आहेत. त्यापैकी सुमारे 60 हजार सोसायट्या आणि अपार्टमेंट पुनर्विकासाला आले आहेत. राज्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे या महानगरांमध्येच सर्वाधिक जुन्या गृहनिर्माण सोसायट्या आणि अपार्टमेंट आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयाचा फायदा या चार महानगरांमधील जुन्या इमारतींमधील सदनिकाधारकांना निश्‍चित होईल, असे महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे उपाध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी सांगितले. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यात येत आहे. याबाबत राज्य शासनाशी चर्चा करून पुढील कार्यवाही करू, असे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

COMMENTS