Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रदेशाध्यक्ष पदातून मला मुक्त करा : नाना पटोले

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँगे्रसने घवघवीत यश मिळवले असले तरी विधानसभा निवडणुकीत काँगे्रसचा दारूण पराभव झालेला आहे. त्याची जबाबदारी स्वीकारत काँग

‘हा प्रोपगंडा आणि वल्गर सिनेमा…’
वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक
वर्धातील त्या भीषण अपघाताची होतेय चर्चा ..का ? | LOKNews24

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँगे्रसने घवघवीत यश मिळवले असले तरी विधानसभा निवडणुकीत काँगे्रसचा दारूण पराभव झालेला आहे. त्याची जबाबदारी स्वीकारत काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँगे्रस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची मागणी केली आहे.
या पत्रात पटोले म्हणतात, माझ्या प्रदेशाध्यक्षपदाला 4 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून मला पदमुक्त करा, असे ते आपल्या पत्रात म्हणाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागा मिळाल्या. त्यात काँग्रेसला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये या पराभवाची चिरफाड सुरू झाली आहे. त्यानुसार नाना पटोले यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी केली आहे. मी मागील 4 वर्षांपासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत माझ्या नेतृत्वात राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे मला आता सर्व जबाबदारीतून मुक्त करावे, असे नाना पटोले यांनी आपल्या पत्रात म्हटल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. नाना पटोले यांनी प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याची विनंतीही आपल्या पत्राद्वारे केली आहे.

COMMENTS