ड्रेसच्या बुकिंग साठी दिलेले एडवान्सचे पैसे परत देण्यास दुकानदाराचा नकार. संतापलेल्या तरुणाने दुकानात घुसून घातला गोंधळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ड्रेसच्या बुकिंग साठी दिलेले एडवान्सचे पैसे परत देण्यास दुकानदाराचा नकार. संतापलेल्या तरुणाने दुकानात घुसून घातला गोंधळ

या प्रकरणी सहा आरोपींना पोलिसांनी केली अटक

कल्याण प्रतीनिधी- कल्याण मध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आधी सिलेक्ट केलेले ड्रेस नंतर आवडले नाहीत. यामुळे हे ड्रेस परत करण्याची मागणी ड्रेस

राष्ट्रवादी’चा काँगे्रसला संपवण्याचा प्रयत्न : नाना पटोले | DAINIK LOKMNTHAN
बारामतीत बस अपघातात 27 विद्यार्थिनी जखमी
*म्युकर मायकोसिसचे संक्रमण हवेतून होऊ शकते – डॉ.गुलेरिया | पहा सुपरफास्ट २४ | LokNews24*

कल्याण प्रतीनिधी- कल्याण मध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आधी सिलेक्ट केलेले ड्रेस नंतर आवडले नाहीत. यामुळे हे ड्रेस परत करण्याची मागणी ड्रेस खरेदी करणाऱ्या तरुणाने केली. मात्र दुकानदाराने या ड्रेसच्या बुकिंग साठी दिलेले एडवान्सचे पैसे परत देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या या तरुणाने थेट दुकानात घुसून डायरेक्ट गल्ल्यातून चार हजार रुपये काढून घेतले. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आहे. तरुणाने मित्रांच्या मदतीने दुकानात घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली.

COMMENTS