Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत धुक्याचा रेड अलर्ट

विमानतळावरील 110 उड्डाणे उशीरा

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीला सध्या दाट धुक्यांनी वेढले असून, धुक्यामुळे राजधानीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच दाट धुक्यांमुळे रेल्वे, रस

पवारवाडीतील हिंदूवर ढवळेवाडीच्या स्मशानभूमीत अंत्यविधी; मुस्लिमांवर आसू येथे अंत्यविधी
डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीतील दगडफेक पूर्वनियोजित ?
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीला सध्या दाट धुक्यांनी वेढले असून, धुक्यामुळे राजधानीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच दाट धुक्यांमुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गावरील वाहतुकीवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी दिल्ली विमानतळावरील 110 उड्डाणे धुक्यामुळे उशीरा सोडण्यात आली आहेत. राजधानीतील पालममध्ये 50 मीटरपेक्षा कमी दृश्यमानता होती.
उत्तरप्रदेशात धुक्यामुळे मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत 6 रस्ते अपघात झाले. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. तर 41 जण जखमी झाले आहेत. गाझियाबादमध्ये दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर एक ट्रक उलटला. यानंतर मागून येणारी 25 वाहने एकमेकांना धडकू लागली. क्रेनच्या मदतीने वाहने बाहेर काढण्यात आली. आग्रा-फिरोजाबाद महामार्गावर 15 वाहने एकमेकांवर आदळली. उन्नावमधील आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर कंटेनर आणि स्लीपर बसमध्ये धडक झाली. काही वेळाने दिल्लीकडे जाणार्‍या दोन स्लीपर बसची पाठीमागून कंटेनर आणि बसची धडक झाली. त्यानंतर दाट धुक्यामुळे यमुना एक्सप्रेसवेवर 12 वाहने एकमेकांवर आदळली. राजस्थानमध्ये धुक्यामुळे 3 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत. भरतपूरमध्ये बस आणि ऑटोची धडक झाली. यामध्ये एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS