Homeताज्या बातम्यादेश

रेमल चक्रीवादळामुळे रेड अलर्ट

एअर इंडियाने रद्द केली 300 हून अधिक उड्डाणे

नवी दिल्ली ः रेमल चक्रीवादळ रविवारी रात्री बांगलादेश आणि पश्‍चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्य

कलाग्रामच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी हक्काचे स्टॉल्स उपलब्ध करून देणार-: मंत्री छगन भुजबळ
शिवसेना कुणाची ? आजपासून सुनावणी
 गुजरातचा पराभूत करुन चेन्नईची फायनलमध्ये धडक

नवी दिल्ली ः रेमल चक्रीवादळ रविवारी रात्री बांगलादेश आणि पश्‍चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या या वादळाचा वेग ताशी 110 ते 120 किलोमीटर असू शकतो. त्यात वाढ होऊन वादळाचा वेगही 130 ते 135 पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळामुळे सोमवारी 27 मे रोजी पश्‍चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिलाय. ईशान्य भारतातील काही राज्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळाच्या पार्श्‍वभूमीवर मच्छिमारांना बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात समुद्र किनार्‍यावर न जाण्याचा इशारा देण्यात आला. चक्रीवादळ रेमलचा संभाव्य प्रभाव लक्षात घेत कोलकाता विमानतळावरून एअर इंडियाची 300 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आलीत. रविवारी दुपारपासून 21 तासांसाठी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा एकूण 394 उड्डाणे विमानतळावरून रद्द करण्यात आली आहेत. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता एनडीआरफचे पथक पश्‍चिम बंगालच्या किनारपट्टीवर दाखल झाले आहे. बंगालच्या 24 परगना जिल्ह्यात एनडीआरएफ अधिकार्‍याने सांगितले की, रेमल चक्रीवादळाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आमची टीम सज्ज आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव प्रामुख्याने पश्‍चिम बंगालच्या किनारी भागात दिसेल. तर हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ईशान्येकडील त्रिपुरा, आसाम, नागालँड आणि मणिपूर या राज्यांमध्ये जोरदार वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

COMMENTS