Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितसोबत आघाडीची चर्चा करण्यास तयार

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे संकेत

पुणे - राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग बघावयास मिळू शकतो. कारण वंचित बहुजन आघाडीने नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक

ऑनलाइन गेमिंगमध्ये करचोरी करणार्‍यांना बसणार चाप
शिरूरमधून आमचाच उमेदवार निवडून आणू
अजित पवारांची थेट अमित शहांशी खलबते

पुणे – राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग बघावयास मिळू शकतो. कारण वंचित बहुजन आघाडीने नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडीचे संकेत दिल्यानंतर बुधवारी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी देखील आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत महाविकास आघाडीचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी या संदर्भात भाष्य केले आहे. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, रा. सु. गवई अशा अनेक नेत्यांबरोबर यापूर्वी आम्ही आघाडी करून निवडणुका लढवल्या आहेत. रामदास आठवले हे भाजपच्या सरकारमध्ये मंत्री होईपर्यंत आमच्यासोबतच होते. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी करण्याचे प्रयत्नही यापूर्वी आम्ही अनेकदा केले होते. दिवंगत आर. आर. पाटील यांनी याविषयी आंबेडकरांशी चर्चाही केली होती. आताही आम्ही त्यांच्याशी चर्चेला तयार आहोत,’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांपैकी आठवले व आंबेडकर हे दोन गट तसे प्रबळ मानले जातात. आठवले यांनी नेहमीच कोणत्या-ना-कोणत्या प्रमुख पक्षाशी आघाडी करून राजकीय वाटचाल केली आहे. त्यांना याचाही अनेकदा फायदाही झाला आहे. सत्तेत काही प्रमाणात का होईना त्यांना वाटा मिळाला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र क्वचितच मोठ्या पक्षांशी थेट आघाडी केली आहे. एमआयएम व अन्य छोट्या पक्षांशी आघाडीचा प्रयोग झाला होता. मात्र, ते पुन्हा त्यांच्यापासून दूर झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत प्रकाश आंबेडकर नेहमीच सावध भूमिका घेत आले आहेत. शरद पवार यांच्यावर ते अनेकदा टीका करताना दिसतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे जमले तरी महाविकास आघाडीसोबत ते येतील का, अशी एक शंका आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर अजित पवार यांचं आजचं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.

COMMENTS