Homeताज्या बातम्यादेश

गुजरात निवडणुकीत भाजपचा निघणार घाम

विरोधकांची कडवी टक्कर ; ओपिनियन पोलचा निष्कर्ष

नवी दिल्ली प्रतिनिधी - गुजरात निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध जिल्ह्यात सभा घेत असले तरी, यंदा भाजपला विधानसभेची निवडणूक सोपी नसल्

दररोज सहा हजार बस प्रवाशांकडून युपीआयद्वारे तिकीट खरेदी
ठाण्यात पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने
ज्येष्ठ पत्रकार राम कुलकर्णी यांना राज्यस्तरीय आदर्श बंधू भरत पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली प्रतिनिधी – गुजरात निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध जिल्ह्यात सभा घेत असले तरी, यंदा भाजपला विधानसभेची निवडणूक सोपी नसल्याचे दिसून येत आहे. कारण या निवडणुकीत विरोधकांनी जोरदार प्रचार चालवल्यामुळे भाजपचा घाम निघतांना दिसून येत आहे. शिवाय बुधवारी विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या ओपिनियन पोलच्या निष्कर्षानुसार भाजपला ही निवडणूक सोपी जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. या निवडणुका या त्रिशंकु होणार असून, भाजपसमोर काँगे्रस आणि आम आदमी पक्षाचे मोठे आव्हान असल्याचे बोलले जात आहे.
इंडिया टीव्हीने गुजरात निवडणुकीसाठी केलेल्याओपिनियन पोलनुसार, भाजपच्या हाती काही प्रमाणात निराशा येण्याची शक्यता आहे. भाजपने 150 जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा केला आहे. मात्र इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलनुसार, गुजरातमध्ये भाजपच्या नेतृत्वात सरकार येणार आहे. मात्र, भाजप नेत्यांकडून करण्यात येणारे दावे आणि जमिनीवरील वस्तुस्थिती वेगळी असल्याचे पोलमध्ये आढळले आहे. ओपिनियन पोलनुसार, भाजपला 182 पैकी 104 ते 119 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसला 53 ते 68 जागांवर विजय मिळू शकतो. आम आदमी पक्षाला 0 ते 6 जागा मिळू शकते. तर, अपक्ष, इतरांना 3 जागा मिळू शकतात. 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 जागांवर विजय मिळाला होता. इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलमध्ये या जागांमध्ये वाढ होत असल्याचे संकेत आहेत. मात्र, या जागा पक्षाच्या नेतृत्वाकडून होत असलेल्या दाव्याच्या आसपासदेखील नाहीत. तर, विरोधी पक्ष काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मागील विधानसभा निवडणुकीत 77 जागा मिळाल्या होत्या. ओपिनियन पोलनुसार, भाजपला 49.5 टक्के, काँग्रेसला 39.1 टक्के आणि आम आदमी पक्षाला 8.4 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर, अपक्ष, इतरांना 8.65 टक्के मते मिळाली होती. ओपिनियन पोलमध्ये मतांच्या टक्केवारीत फारसा बदल झाला नसला तरी जागांच्याबाबतीत मोठा बदल दिसून आला आहे.मध्य गुजरातमध्ये 61 जागा असून भाजपला 41 आणि काँग्रेसला 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, आम आदमी पक्षाला आणि अन्य पक्षांना शून्य ते एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. सौराष्ट्र-कच्छ भागात 54 जागा आहेत. या भागांमध्ये भाजपला 30 जागांवर आणि काँग्रेसला 21 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. आम आदमी पक्षाला तीन जागांवर विजय मिळू शकतो. दक्षिण गुजरातमध्ये 35 जागा असून भाजपचे एकहाती वर्चस्व राहू शकते. भाजपला 26 जागा, काँग्रेसला 6 जागा आणि आम आदमी पक्षाला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. तर 32 जागा असलेल्या उत्तर गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस असणार असून दोन्ही पक्षांना प्रत्येकी 16-16 जागा मिळू शकतात.

COMMENTS