वाचन संस्कृती वाढविणे आणि प्रतिष्ठित करणे गरजेचे : डॉ. बाबुराव उपाध्ये

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाचन संस्कृती वाढविणे आणि प्रतिष्ठित करणे गरजेचे : डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर/प्रतिनिधी : पुस्तके ही मस्तकं आणि जीवन घडवितात त्यासाठी वाचन संस्कृती वाढविणे आणि प्रतिष्ठित करणे ही काळाची गरज आहे, असे मत ग्रामीण साहित्

संपादक राज्य परिषदेचे संगमनेर येथे आयोजन
सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन
महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले : काँग्रेस

श्रीरामपूर/प्रतिनिधी : पुस्तके ही मस्तकं आणि जीवन घडवितात त्यासाठी वाचन संस्कृती वाढविणे आणि प्रतिष्ठित करणे ही काळाची गरज आहे, असे मत ग्रामीण साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले. येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान कार्यालयात अर्जुन राऊत यांनी डॉ.बाबुराव उपाध्ये यांचा सन्मान केला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
साहित्य आणि साहित्यिक हे मानवी संस्कृतीची पूजा करतात, समाजाला दिशा दाखवितात,संस्कृती जतन करून ठेवतात आणि निर्मळ मनाने निर्मळ जगाची उभारणी करतात त्यांच्या सन्मानात संस्कृतीची पूजा होय, ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष अर्जुन राऊत यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष ग्रामीण साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा सत्कार करताना बोलत होते. यावेळी उपाध्ये परिवारासह ज्ञानज्योतीचे अक्षय कोकणे उपस्थित होते. अर्जुन राऊत यांनी डॉ. उपाध्ये यांना ज्ञानज्योतीचे सन्मानचिन्ह, बुके देऊन सत्कार करून म्हणाले, हा सत्कार डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या वाचन चळवळीचा, त्यांच्या साहित्य आणि शैक्षणिक योगदानाचा सत्कार आहे.ग्रामीण भागातील सेवाकार्य करणार्‍या व्यक्तीचा सन्मान करून त्यांना सत्कार्यासाठी प्रेरणा देण्यासाठी असे सन्मान आहेत. चांगले काम करताना ज्यांचे सहकार्य मिळते ती माणसे सकारात्मक दृष्टीची असतात,जे आशीर्वाद देतात, मदत करतात ती माणसं मला श्रद्धास्थानी आहेत, असे सांगून राऊत यांनी नोव्हेंबर डिसेंबर 2022 च्या काळात टाकळीभानला पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन घेणार आहे, असे सांगितले. डॉ. उपाध्ये यांनी झालेल्या सत्काराबद्दल ज्ञानज्योतीच्या सर्वांचे आभार मानून टाकळीभान हे साहित्य पंढरीचे गाव होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

COMMENTS