Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या नवीन दोन शाखेस रिझर्व्ह बँकेची मान्यता

संभाजीनगर(सातारा परिसर) व चौसाळकर कॉलनी अंबाजोगाई येथील नवीन शाखेसाठी आरबीआयची मान्यता

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या शाखा विस्तारणा प्रक्रियेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या वतीने दोन नवीन शाखेसाठी नुकतीच मान्

‘न्यूड फोटोशूट’ प्रकरणी रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ.
विदेशी घड्याळ अपहाराप्रकरणी आरोपीला अटक
बदलापूर घटनेचा बेलापूरात विविध संघटनानी केला निषेध

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या शाखा विस्तारणा प्रक्रियेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या वतीने दोन नवीन शाखेसाठी नुकतीच मान्यता दिल्याची माहिती अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांनी दिली आहे. सध्या बँकेच्या सोळा शाखांसाह दोन विस्तारित शाखा महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहेत. आगामी काळात आणखी पाच शाखांची मागणी रिझर्व्ह बँकेकडे करणार असल्याची माहिती राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.
मागील काही काळापासून  महाराष्ट्रातील अनेक बँकांच्या विविध शाखांची मागणी प्रलंबित होती. कोरोना महामारी व अन्य कारणांमुळे नवीन शाखांना परवानगी  मिळत नव्हती. मात्र सध्याचे निवळलेले वातावरण व देशातील आर्थिक स्थैर्य यामुळे देशातील बँकांना व नवीन शाखांना परवानगी देण्यात आली आहे.  अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक सध्या राज्यातील दहा जिल्ह्यात आपल्या विविध शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देत आहे .आगामी काळात संपूर्ण राज्यात बँकेच्या शाखांचे जाळे विकण्यासाठी बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी प्रयत्नशील असून याकामी  नक्कीच यश मिळेल अशी अपेक्षा राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली. येणार्‍या काळात पुणे येथील पिंपरी चिंचवड , परळी, केज व धारूर या ठिकाणी आपल्या बँकेच्या नवीन शाखा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव आरबीआयकडे प्रलंबित असून लवकरच या नवीन शाखांना परवानगी मिळेल अशी अपेक्षा राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली. अंबाजोगाई पिपल्स बँकेने मार्च 2023अखेर 500 कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे . येत्या आर्थिक वर्षात बँकेचा 600कोटींचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न असून तो देखील तडीस नेण्यासाठी अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संचालक मंडळ राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बँकेचे सर्व कर्मचारी मेहनत घेत आहेत. अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेने सन 2022-2023 मधील केलेल्या उत्तम कामकाजामुळे 31 मार्च 2023 अखेर बँकेने 500 कोटींच्या ठेविचा टप्पा ओलांडला आहे . बँकेची एकूण सभासद संख्या 11747 एवढी असून बँकेच्या वतीने ग्राहकांसाठी  रु.319 कोटीचे अर्थसहाय्यच्या माध्यमातून कर्जवाटप केले आहे. बँकेची रिझर्व्ह बँक व अन्य ठिकाणीची गुंतवणूक ही  रु 217 कोटी एवढी आहे . 31 मार्च 2023  अखेर बँकेने एकूण ठेवी रु.500 कोटी 19 लाख एवढ्या जमा  केलेल्या आहेत . बँकेस  31मार्च 2023 अखेर 5 कोटी 50 लाख इतका नफा मिळवला आहे.सर्व क्षेत्रातील परिस्थिती पाहता बँकेचे संचालक मंडळ,  अधिकारी व कर्मचारी वृंद  तसेच कर्जदार , ठेवीदार  व सभासद यांच्या सांघिक कामगिरीमुळे बँकेस हे प्रगतीचे उद्दीष्ट साध्य करता आले असल्याचे बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जड यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे .कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमी, देशातील आर्थिक मंदी, तसेच वाढती महागाई अशा अवघड परिस्थितीअसतांना  देखील ग्राहकांच्या विश्वासास अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक ही  पात्र ठरली असल्याचे संस्थापक राजकिशोर मोदी यांनी स्पष्ट केले आहे.  अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या वतीने केवळ अर्थकारण च न करता मागील काळात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले आहेत .मागील वर्ष हे बँकेचे रौप्य महोत्सवि वर्ष साजरे करून  त्यानिमित्ताने शहरात अनेक कार्यक्रमाची मांदियाळी दिसून आली. ज्यामध्ये शहरातील गुणिजनांचा सन्मान , रक्तदान शिबिर याबरोबरच महिलांसाठी बँकिंग क्षेत्राची माहिती व्हावी यासाठी बँकिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन देखील करण्यात येऊन विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते .या व अशा इतर अनेक कारणांमुळे बँक ग्राहकांच्या प्रथम पसंतीस उतरली असल्याचे समाधान बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले आहे .यापुढेही अर्थकारणासोबतच वारंवार असेच सामाजिक कार्यक्रम घेऊन ग्राहकांच्या पसंतीस सदैव राहण्याचा संकल्प राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला .

COMMENTS