Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वरुणराजाच्या रौद्र अवतार: 40 शेळ्या-मेंढ्या गारठून ठार

खटाव / प्रतिनिधी : खटाव परिसरात बुधवारी रात्री अचानक हजेरी लावलेल्या पावसात हुसेनपूर शिवारात रामचंद्र चव्हाण या मेंढपाळाची गारठून 40 मेंढ्या ठार

भूजल समृध्द ग्रामस्पर्धेत जिल्ह्यात किरकसाल प्रथम
तरडगाव येथे आज धावणार बैलगाड्या
महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अर्जेंटिनाच्या तंत्रज्ञानाचे सहकार्य

खटाव / प्रतिनिधी : खटाव परिसरात बुधवारी रात्री अचानक हजेरी लावलेल्या पावसात हुसेनपूर शिवारात रामचंद्र चव्हाण या मेंढपाळाची गारठून 40 मेंढ्या ठार झाल्याने संपूर्ण मेंढपाळांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणी (ता. खटाव) येथील श्रीमंत शिंदे यांच्या हुसेनपूर येथील शेतात चव्हाण व त्यांचा मावस भाऊ यांनी गेली सहा दिवस कराराने मेंढ्या बसवल्या होत्या. अचानक रात्रीच्या वेळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मेंढ्या सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली. मात्र, अंधार पडला असल्याने व चिखल झाल्याने त्यांना मर्यादा आल्या. परिणामी, 40 मेंढरे गारठून ठार झाली.
याबाबत अधिक माहिती अशी, की लोणी (ता. खटाव) येथील श्रीमंत शिंदे यांच्या हुसेनपूर येथील शेतात चव्हाण व त्यांचा मावस भाऊ यांनी गेली सहा दिवस कराराने मेंढ्या बसवल्या होत्या. अचानक रात्रीच्या वेळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मेंढ्या सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली.
मात्र, अंधार पडल्याने व चिखल झाल्याने त्यांना मर्यादा आल्या. परिणामी, 40 मेंढ्या गारठून मृत झाली. काही अत्यावस्थ स्थितीत आहेत. एकदम 40 मेंढ्या दगवल्याने चव्हाण कुटुंबियांवर आकाश कोसळले आहे. शासनाने या घटनेची माहिती घेऊन त्वरित पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी विनंती चव्हाण दाम्पत्यांनी केली आहे.

COMMENTS