अहमदनगर/प्रतिनिधी ः सत्तावीस वर्षीय विवाहित तरुणीस बळजबरीने प्रेम संबंध ठेवण्यास सांगणार्या दिल्याने तिचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची घटना

अहमदनगर/प्रतिनिधी ः सत्तावीस वर्षीय विवाहित तरुणीस बळजबरीने प्रेम संबंध ठेवण्यास सांगणार्या दिल्याने तिचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची घटना सावेडी परिसरात घडली.
याबाबतची माहिती अशी की 27 वर्षीय विवाहित करण्याचे तिच्या पतीशी पटत नसल्याने ती आईकडे मुलासह राहते. मागील सहा महिन्या पासून ती खासगी नोकरी करीत आहे. अशोक बाबासाहेब ससे, (राह. ससेवाडी, ता.नगर, ) याची व त्या तरूणीची सुमारे 5 ते 6 वर्षापुर्वीपासुन ओळख आहे. मैत्री संबंधामध्ये तो तिचेवर प्रेम करण्यासाठी दबाव टाकु लागल्याने ती तरूणी सुमारे 3 वर्षांपासून त्याच्यासोबत बोलत नाही. अधुनमधुन अशोक ससे हा तिला फोन करून माझेशी प्रेमाचे संबंध ठेव असे म्हणत असे. तसेच 14 रोजी या तरुणीला बोलवून, गाडीत बसवले, मी कामावर आहे मला गाडीत कुठे घेवुन जावू नको. तरीही तो गाडी थांबवत नसल्याने ती गाडीचा दरवाजा उघडुन बाहेर येण्याचा प्रयत्न करु लागली असता त्याने गाडी थाबवुन तिचे उजवे हाताला पकडुन त्याचेजवळ ओढुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. तु जर माझे सोबत प्रेमाचे संबंध ठेवले नाही तर ऍसीड टाकुन तुझा चेहरा खराब करीन. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अशोक ससे याचेविरुध्द गुन्ह्याची नोंद केली असून पुढील कारवाई पोलिस हवालदार वाघमारे हे करीत आहे.
COMMENTS