वडूज / प्रतिनिधी : गेल्या गाळप हंगामातील उर्वरित दोनशे रुपये आणि सुरू गाळप हंगामातील एकरकमी एफआरपीची पहिली उचल जाहीर केल्याशिवाय आम्ही कारखाने चा
वडूज / प्रतिनिधी : गेल्या गाळप हंगामातील उर्वरित दोनशे रुपये आणि सुरू गाळप हंगामातील एकरकमी एफआरपीची पहिली उचल जाहीर केल्याशिवाय आम्ही कारखाने चालू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. पेडगाव (ता. खटाव) येथे संघटनेच्या शाखेचे उद्घाटन व बैठक झाली. त्या वेळी शेकडो शेतकर्यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकार्यांनी ऊसदराच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले.
या वेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले, जिल्ह्यातील इतर कारखाने तीन हजार रुपयांच्या आसपास दर देत असताना खटावमध्ये मात्र, हा दर अडीच हजार रुपयांच्या आसपास रेंगाळला आहे. केंद्र सरकारने या हंगामासाठी 150 रुपये एफआरपीमध्ये वाढ केली असली, तरी रिकव्हरी बेस दहा टक्क्यांवरून 10.25 टक्के केल्याने प्रत्यक्षात 77 रुपयांची वाढ शेतकर्यांच्या हातात पडणार आहे. मात्र, ही वाढ खटावमधील कारखानदार द्यायला तयार नाहीत.
जिल्हाध्यक्ष तानाजीराव देशमुख म्हणाले, दोन-तीन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी गोपूजच्या ग्रीन पॉवर शुगर, पडळच्या खटाव-माण शुगर व वर्धनी शुगर या कारखान्याच्या व्यवस्थापनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. मात्र, कोणीही पहिल्या उचलीची घोषणा केली नाही. त्यामुळे संघटना संतप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद देवकर, दत्तू घार्गे, राजू फडतरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सूर्यकांत भुजबळ, श्रीकांत लावंड यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS