औंध / वार्ताहर : खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात भव्य स्वागत करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने जिल्हावार समन्वयकाची नियु
औंध / वार्ताहर : खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात भव्य स्वागत करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने जिल्हावार समन्वयकाची नियुक्ती करुन त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. सातारा जिल्ह्याचे समन्वयकपदी प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी व हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून प्रवास करतांना त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्ते सहभागी करण्याची व राहुल गांधींचा संदेश जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची जबाबदारी समन्वयकांवर सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी समन्वयक नियुक्त केले आहेत. सातारा जिल्ह्याची जबाबदारी रणजितसिंह देशमुख यांच्याकडे देण्यात आल्याचे मुंबईत झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. यावेळी नानाभाऊ पटोले, बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण यांचेसह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
भारत जोडो यात्रेतील सहभाग व विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक रविवार, दि. 23 रोजी घेण्यात येणार आहेत. या बैठकीला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व ज्येष्ठ नेते उल्हास पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती रणजितसिंह देशमुख यांनी दिली. निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचेसह विविध मान्यवरांनी देशमुख यांचे अभिनंदन केले.
COMMENTS