अकोले ः अकोले तालुक्यातील अबीतखिंड (भोजनेवाडी) येथील भूमीपुत्र व मुंबई, मुलुंड येथे ओरियंटल इन्शुरन्स कंपनी क्षेत्रीय कार्यालय 3 येथे प्रशासकीय

अकोले ः अकोले तालुक्यातील अबीतखिंड (भोजनेवाडी) येथील भूमीपुत्र व मुंबई, मुलुंड येथे ओरियंटल इन्शुरन्स कंपनी क्षेत्रीय कार्यालय 3 येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवारत असणारे रामनाथ भोजने हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. इन्सुरन्सन कंपनी मध्ये त्यांनी 38 वर्षे सेवा केली.
अबीतखिंड येथे प्राथमिक शिक्षण 10 वीपर्यंत मॉडर्न हायस्कूल अकोले येथे शालेय तर महाविद्यालयीन शिक्षण सिद्धार्थ कॉलेज मुंबई फोर्ट येथे झाले, त्यानंतर 1987 साली त्यांनी ओरियंटल विमा कंपनीत सेवा सुरू केली घरच्या खडतर परिस्तिथीत शिक्षण घेऊन नोकरी मिळविली आणि 38 वर्षे सेवा पूर्ण करून ते सेवा निवृत्त झाले. त्यांचा क्षेत्रीय कार्यालयात सर्व अधिकारी कर्मचारी यांचे वतीने त्यांचा सत्कार केला, तसेच कल्याण येथे स्थानीय लोकाधिकार समिती मुंबई यांचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोकाधिकारचे अध्यक्ष संजय शिर्के, संजय ताणवडे , रिजनल मॅनेजर श्रीमती कांतोडे, शाखा प्रबंधक सुहासिनी, ऑल इंडिया एसटीएसी ओबीसी जनरल इन्शुरन्स इम्पोलाईज फेडरेशन चें जनरल सेक्रेटरी दिनेश मोरे, संजय मिसाळ, ओरियंटतल इन्सुरन्स कंपनीचे क्षेत्रीय संगीता पाटोल, वैशाली खिलारे, विश्वनाथ पाटील यांनी यावेळी भोजने यांचा सत्कार केला.
COMMENTS