Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंधू प्रेम आणि त्यागाची शिकवण देणारे भरत चरित्र  रामयनाचार्य समाधान महाराज यांचे प्रतिपादन 

जनार्दन स्वामींच्या पुण्यस्मरणात विविधांगी कार्यक्रम ; भाविकांची अलोट गर्दी

नाशिक प्रतिनिधी - रामायणाची कथा क्रांती आणते आणि यातूनच जीवनाला शांती मिळते.आजच्या युगात राज्यप्राप्तीसाठी राजकारणी कोण-कोणत्या थराला जातात.मात्र

जोशीमठ-बद्रीनाथ महामार्गावर पुन्हा भेगा
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातच मिळणार रहिवासी दाखला
नगर-शिर्डी महामार्गासाठी नवीन निविदा काढून रस्त्याचा प्रश्‍न सोडवा

नाशिक प्रतिनिधी – रामायणाची कथा क्रांती आणते आणि यातूनच जीवनाला शांती मिळते.आजच्या युगात राज्यप्राप्तीसाठी राजकारणी कोण-कोणत्या थराला जातात.मात्र राज्य मिळूनही ते नाकारनारे भरत यांचे चरित्र खऱ्या अर्थाने बंधू प्रेमाबरोबरच त्याग शिकवते असे प्रतिपादन प्रसिद्ध रामयनाचार्य समाधानजी महाराज शर्मा यांनी केले.

     जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने कठोर तपस्वी  निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या ३४ व्या पुण्यतिथी निमित्त उत्तराधिकारी अनंत विभूषित समर्थ सदगुरू श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरनेने व प्रमुख उपास्थितीत नाशिक शहरातील तपोवन परिसरात आयोजित जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्या प्रसंगी जपानुष्ठान,अखंड नंदादीप,महायज्ञ,नामसंकीर्तन,

भागवत पारायण आदी विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी राम कथेचाही हजारो भाविक लाभ घेत आहे.

श्रीराम कथे प्रसंगी श्रीराम-भरत भेटीचा प्रसंग सांगतांना रामयनाचार्य समाधान महाराज शर्मा म्हणाले की आजच्या युगात राज्यासाठी कोणत्या थराला राजकारणी जातात हे पाहिल्यानंतर भरताप्रतीचा आदर शतगुणित होतो. राज्य मिळून ते नाकारणारा भरत श्रेष्ठ की सर्वस्वाचा त्याग करून वडीलबंधू समवेत वनवास स्वीकारणारा लक्ष्मण श्रेष्ठ ही तुलनाच करण अशक्य आहे.

अयोध्येत दशरथ राजा रामाच्या विरहाने दु:खी असतात. त्यांना श्रावणकुमारच्या पित्याच्या शापाची आठवण होते. तेवढ्यात सुमंताकडून श्रीराम चित्रकुट पर्वतावर आहेत हे कळताच राम राम करत ते आपला प्राण सोडतात. अयोध्या शोकसागरात बुडते. भरत -शत्रुघ्नला आणण्यासाठी दूत पाठविण्यात येतो. भरत अयोध्येत येतो, तेव्हा त्याला अयोध्या अतिशय शांत भासते. त्याला नगरीतलं चैतन्य हरपले आहे असे वाटते. भरताला कैकयीकडून दशरथाच्या मृत्यूची आणि रामाच्या वनवासाची हकीकत कळते.आपल्याला राज्य प्राप्त होण्यासाठी आईने कुटील कारस्थान रचले हे कळताच तो कैकयीचा धिक्कार करतो आणि श्रीरामास पुन्हा अयोध्येस आणीन, अशी शपथ घेतो. भरत आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार करतो आणि रामांना अयोध्येत परत आणण्यासाठी चित्रकुटावर जाण्याचा निश्चय करतो.कदाचित आपल्या सहवासात बुद्धिभेद करणारे असू शकतात पण त्यांच्या सांगण्यानुसार वागल्यास कैकयीसारखी अवस्था होते. ज्या पुत्रासाठी राज्य मागून घेतल्या जाते तो पुत्र राज्य नाकारतो आणि भाळी वैधव्य येते. भरत-शत्रुघ्न, तिन्ही माता, वसिष्ठ ऋषी आणि अयोध्येचे मंत्री चित्रकुटावर जाण्यास निघतात. वाटेत त्यांची निषादराजगुहाची भेट होते. अयोध्येच्या लवाजम्यासहित भरत चित्रकुटावर पोहोचतो तिथे राम-भरत भेट होते.असा दिव्य प्रसंग रामयनाचार्य समाधान महाराज यांनी आपल्या खास शैलीत सांगितले.

श्रीराम कथे प्रसंगी श्रीराम-भरत भेटीचा प्रसंग सांगतांना रामयनाचार्य समाधान महाराज शर्मा म्हणाले की आजच्या युगात राज्यासाठी कोणत्या थराला राजकारणी जातात हे पाहिल्यानंतर भरताप्रतीचा आदर शतगुणित होतो. राज्य मिळून ते नाकारणारा भरत श्रेष्ठ की सर्वस्वाचा त्याग करून वडीलबंधू समवेत वनवास स्वीकारणारा लक्ष्मण श्रेष्ठ ही तुलनाच करण अशक्य आहे.

अयोध्येत दशरथ राजा रामाच्या विरहाने दु:खी असतात. त्यांना श्रावणकुमारच्या पित्याच्या शापाची आठवण होते. तेवढ्यात सुमंताकडून श्रीराम चित्रकुट पर्वतावर आहेत हे कळताच राम राम करत ते आपला प्राण सोडतात. अयोध्या शोकसागरात बुडते. भरत -शत्रुघ्नला आणण्यासाठी दूत पाठविण्यात येतो. भरत अयोध्येत येतो, तेव्हा त्याला अयोध्या अतिशय शांत भासते. त्याला नगरीतलं चैतन्य हरपले आहे असे वाटते. भरताला कैकयीकडून दशरथाच्या मृत्यूची आणि रामाच्या वनवासाची हकीकत कळते.आपल्याला राज्य प्राप्त होण्यासाठी आईने कुटील कारस्थान रचले हे कळताच तो कैकयीचा धिक्कार करतो आणि श्रीरामास पुन्हा अयोध्येस आणीन, अशी शपथ घेतो. भरत आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार करतो आणि रामांना अयोध्येत परत आणण्यासाठी चित्रकुटावर जाण्याचा निश्चय करतो.कदाचित आपल्या सहवासात बुद्धिभेद करणारे असू शकतात पण त्यांच्या सांगण्यानुसार वागल्यास कैकयीसारखी अवस्था होते. ज्या पुत्रासाठी राज्य मागून घेतल्या जाते तो पुत्र राज्य नाकारतो आणि भाळी वैधव्य येते. भरत-शत्रुघ्न, तिन्ही माता, वसिष्ठ ऋषी आणि अयोध्येचे मंत्री चित्रकुटावर जाण्यास निघतात. वाटेत त्यांची निषादराजगुहाची भेट होते. अयोध्येच्या लवाजम्यासहित भरत चित्रकुटावर पोहोचतो तिथे राम-भरत भेट होते.असा दिव्य प्रसंग रामयनाचार्य समाधान महाराज यांनी आपल्या खास शैलीत सांगितले. कथे प्रसंगी अनंत विभूषित समर्थ सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे आगमन होताच उपस्थित हजरो भविकांनी नाचून-गाऊन आनंदोत्सव साजरा केला.जय श्रीराम कथे प्रसंगी विविध क्षेत्रातील भाविकांची व हजारो भाविकांची उपास्थिती लाभत आहे.

COMMENTS