Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विंचूर येथील महिलांकडून पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी. 

विंचूर - विंचूर येथील महिलांनी रक्षाबंधनानिमित्त विंचूर पोलिस चौकीच्या पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या कार्यक्रमाला पोलिस

पंतप्रधान करणार नोएडा विमानतळाची पायाभरणी
अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर
भटकंती करणारांच्या पालावर झाले रक्षाबंधन ;कामरगावच्या रहिवाशांचा अनोखा उपक्रम

विंचूर – विंचूर येथील महिलांनी रक्षाबंधनानिमित्त विंचूर पोलिस चौकीच्या पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या कार्यक्रमाला पोलिस संदीप निचळ,कैलास बिडगर,सागर आरोटे  व सैन्य दलात कार्यरत असणारे चेतन (सोनू)  मोरे यांनी  हजेरी लावत शहरातील भगिनींच्या रक्षणाचे वचन दिले.तसेच 

रक्षाबंधन असो, वा अन्य कोणताही सण, पोलिसांना शहरातील शांतता, कायदा सुव्यस्था सांभाळण्यासाठी कामावर हजर राहावे लागते. त्यामुळे अनेकदा आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधनासारखा सण साजरा करता येत नाही. त्यामुळे विंचूर येथील महिलांनी यंदाचे रक्षाबंधन पोलिसांसोबत साजरे करण्याचे ठरवले. आम्हाला अनेकदा कामामुळे आमच्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा करता येत नाही, आज शहरातील या महिलांनी आमच्यासोबत रक्षाबंधन साजरे केल्याने, आम्हालाही अत्यंत आनंद झाल्याची भावना पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.विंचूर येथील जिव्हेश्वर महिला मंडळाच्या वतीने भवानी पेठेतील भगवान श्री जिव्हेश्वर मंदिर या ठिकाणी रक्षाबंधन साजरे करण्यात आले होते.

COMMENTS