श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : भाजप अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र उकांडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री आ. बबनराव पाचपुत

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : भाजप अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र उकांडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांचे ते कट्टर समर्थक आहेत. उकांडे यांनी श्रीगोंदा शहराध्यक्षपदी तसेच तालुका उपाध्यक्ष पदी काम केले आहे. या कार्यकाळात केलेल्या सामाजिक कामाची दखल घेत त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजप जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आ. बबनराव पाचपुते, खासदार डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली. या निवडीबद्दल डॉ. प्रतिभाताई बबनराव पाचपुते, प्रतांपसिह बबनराव पाचपुते, जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, नगर परिषदेचे गटनेते बापूसाहेब गोरे, अशोक खंडके, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, संजय खेतमाळीस, संग्राम घोडके, अंबादास औटी, आदींनी उकांडे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
COMMENTS