Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड प्रांत कार्यालयातील दोघे लाच घेताना गजाआड

कराड / प्रतिनिधी : भूसंपादनाची मुल्यांकन प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी प्रत्येकी 10 हजार रुपयाप्रमाणे 20 हजाराची लाच स्विकारणार्‍या दोन कंत्राटी लिप

मिर्झापूर फेम अभिनेत्रीचा सेटवर अपघात
वीज  वारंवार खंडीत होत असल्याने नागरिकांना सहन करावा लागतोय नाहक त्रास
सत्ता स्थापनेसाठी जोर-बैठका | DAINIK LOKMNTHAN

कराड / प्रतिनिधी : भूसंपादनाची मुल्यांकन प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी प्रत्येकी 10 हजार रुपयाप्रमाणे 20 हजाराची लाच स्विकारणार्‍या दोन कंत्राटी लिपिकांना रंगेहाथ पकडण्यात आले. कराड शहरातील प्रांत कार्यालयामधील भूसंपादन शाखेत शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने प्रांतसह तहसिल कार्यालयात खळबळ उडाली.
रामचंद्र श्रीरंग पाटील (वय 70) व दिनकर रामचंद्र ठोंबरे (वय 70) अशी लाचप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कराड तालुक्यातील येरवळे येथील नऊ शेतकर्‍यांकडून भूसंपादनाच्या प्रक्रियेत विविध शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करण्यासाठीचे प्रतिज्ञापत्र घेतले आहे. त्याप्रमाणे ते शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करत आहेत. या कामासाठी ते प्रांत कार्यालयातील भूसंपादन शाखेमध्ये गेले होते. त्यावेळी शाखेतील कंत्राटी लिपिक रामचंद्र पाटील व दिनकर ठोंबरे या दोघांनी भूसंपादनाच्या मुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी प्रत्येकी 10 हजाराप्रमाणे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपतच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी शुक्रवारी सापळा रचला. लाचेची रक्कम स्विकारताना दोन्ही कंत्राटी लिपिकांना त्यांनी ताब्यात घेतले. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक उज्वल जैन, पोलीस निरीक्षक विक्रम पवार, सहाय्यक फौजदार शंकर सावंत, पोलीस नाईक निलेश राजपूरे, कॉन्स्टेबल विक्रमसिंह कणसे यांनी ही कारवाई केली.

COMMENTS