Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलीला पळवले, पुन्हा घरी सोडले व पुन्हा पळवले…

पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी ः सुमारे एक महिन्यापूर्वी माळीवाडा परिसरात राहणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या तरुणाने पुन्हा त्या मुलीला पळवू

नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आ. काळेंच्या तहसीलदारांना सूचना
शिर्डी मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
खर्डा खून प्रकरणातील मुख्य आरोपी मोकाट | LOKNews24

अहमदनगर/प्रतिनिधी ः सुमारे एक महिन्यापूर्वी माळीवाडा परिसरात राहणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या तरुणाने पुन्हा त्या मुलीला पळवून नेले आहे. सोमवारी ही घटना घडली असून पीडित मुलीच्या आईने कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पळवून नेणारा संशयित तरुण अविनाश पांडूरंग मराठेविरोधात भादंवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांच्या मुलीला अविनाश मराठे याने सुमारे एक महिन्यापूर्वी पळवून नेले होते. त्यानंतर ते दोघे नाशिक येथे मिळून आले होते. त्यावेळी त्या दोघांनी लिहून दिले होते की, आम्ही सज्ञान झाल्यावर लग्न करू, परंतु सोमवारी सकाळी फिर्यादीची मुलगी कॉलेजला जाण्यासाठी घराच्या बाहेर पडली व ती पुन्हा घरी आली नाही. फिर्यादीने तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. अविनाश मराठे हा देखील त्याच्या घरी नसल्याने व त्याचा फोन बंद असल्याने त्यानेच मुलीला पुन्हा पळवून नेले असावे, असा संशय फिर्यादीला आहे. तशी फिर्याद त्यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.

COMMENTS