इस्लामपुर / प्रतिनिधी : राजारामबापु सहकारी साखर कारखाना खर्या अर्थाने तालुक्यातील ऊस उत्पादकांची मातृसंस्था असती तर प्रत्येक ऊस उत्पादक शेतकर्याल
इस्लामपुर / प्रतिनिधी : राजारामबापु सहकारी साखर कारखाना खर्या अर्थाने तालुक्यातील ऊस उत्पादकांची मातृसंस्था असती तर प्रत्येक ऊस उत्पादक शेतकर्याला सभासद करून त्याचा सन्मान केला असता. हि मातृसंस्था नसुन तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांवर अन्याय करणारी, अर्थिक पिळवणुक करणारी, शेतकर्यांना हक्कापासुन वंचित ठेवणारी व अपमानित करणारा हुकुमशाहीचा अड्डा आहे. तुम्ही सांगता कारखानदारी अडचणीत आहे. मग एका कारखान्याचे चार कारखाने कसे झाले. तालुक्याचा विकास झाला असे म्हणता मग आज ही तालुक्यातील शेतकरी कर्जाच्या विळाख्यात का अडकुन आहे. याचे चांगले ज्ञान तुम्हाला आहे. आमच्या अज्ञानावर बोलण्या ऐवजी आपण अभ्यासु, ज्ञानी आहात तर तुम्ही आजही ऊस उत्पादक कष्टकरी शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली का आहे? याचे उत्तर द्यावे असा सवाल राजारामबापु कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांना वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पुढे मोरे म्हणाले, पी. आर. पाटील यांनी राजारामबापु कारखान्याच्या कारभाराबद्दल खर्या अर्थाने स्पष्ट आणि सत्य बोलायला हवे होते. कारखान्याच्या कारभारात किती पारदर्शकता आहे हे प्रत्येक ऊस उत्पादक सभासदाला, तुमच्या बरोबर काम करत असलेल्या संचालकांना चांगले माहित आहे. निशिकांत दादांनी राजारामबापु कारखान्याची साखर अफगाणिस्तानातुन पाकिस्तानात कशी जाते असा सवाल मुळीच केला नव्हता, तर एक खाजगी कंपनी देशातील साखर खरेदी करते ही खाजगी कंपनी कोणाची आहे, त्यामध्ये कोण-कोण संचालक आहेत, या कंपनीने शत्रु राष्ट्रात साखर निर्यात केलेचा आरोप केला होता. साखर खरेदी करणारी टोळी कोणाची आहे, या टोळीत कोणाच्या कुटुंबातील घटक आहेत आणि हिच टोळी एका खाजगी कंपनीच्या नावाखाली देशातील साखर खरेदी करून इतर देशात साखर निर्यात करीत असते. अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती मात्र आपण या विषयावरून इतके का अस्वस्थ झालात. तुमचे या कंपनीशी काही संबंध आहे का? राजारामबापु कारखान्याने या कंपनीला साखर दिली आहे का? यामुळेच आपण अस्वस्थ झालात का? राजारामबापु सहकारी साखर कारखान्याचे काम केंद्र सरकारचे धोरण व नियमानुसार चालते असा आपण मोठया विश्वासाने सांगत आहात. हे खर्या अर्थाने तालुक्यातील जनतेच्या व ऊस उत्पादक शेतकर्यांच्या डोळयात धुळफेक करणारे वक्तव्य आहे. आपण शेतकर्यांची अडवणुक व पिळवणुक किती करता व शेतकरी तुमच्या दडपशाहीखाली किती असतो हे सर्वांना ज्ञात आहे. शेतकर्यांवर तुम्ही आंधळे प्रेम करू नका. बाजार पेठेत रूपया, दोन रूपयाला मिळणारा एक रॉड आपण आठ-नऊ रूपयाला खरेदी करता हे कोणाकडुन करता. म्हणजे एखाद्याचे घर भरले आणि एखाद्याचे दोन-दोन पेट्रोल पंप झाले म्हणजे तालुक्याचा व शेतकर्यांचा विकास झाला असे नाही. जसे रॉड सहा-सात पटीने जास्त दराने खरेदी करता व संबंधीत एजन्सीला पैसे देता त्याच पटीत शेतकर्यांच्या ऊसाला आपण दर देणार का? असा शेतकर्यांचा प्रश्न तुम्हाला आहे.
माझ्या कुटुंबाने लोकनेते राजारामबापु पाटील यांच्याबरोबर अत्यंत निष्ठेने, प्रमाणिक व कोणतीही अपेक्षा न ठेवता काम केले. मी ही पुढे जयंत पाटील यांच्या बरोबर अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे व कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्यांच्या हाकेला ओ देत सदैव त्यांच्याबरोबर राहिलो. राजकारणातही कर्तबगार व नविन चेहर्यांना संधी योग्य वेळी मिळायला हवी होती व ही संधी देण्यासाठी नेत्याचेही मन मोठे असायला हवे होते. मात्र दुर्दैवाने जयंत पाटील यांचे मन खुप छोटे असल्याने निशिकांत दादांच्यासह माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना मार्ग बदलावा लागला. आपण ही स्व. राजारामबापुंच्या निधनानंतर जयंत पाटील यांना कारखान्याच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करताना आपण त्यांना प्रचंड विरोध केला होता. हे आजही अनेक राजकारणातील जाणकार लोक सांगत आहेत. हे खरे आहे का?
याचबरोबर मा. उच्च न्यायालय खंडपीठ यांनी दिलेल्या आदेशानुसार एका गाळप हंगामामध्ये दोन दर द्यायचे नाहीत. असा आदेश असताना 2017-18 च्या गाळप हंगामात आपण असे दोन दर दिले आहेत. डिसेंबर महिना अखेर वेगळा व त्यानंतर आलेल्या ऊसाला वेगळा असा दर आपण दिला आहे. यातील 114 रू प्रतिटनचा फरक आपली मातृसंस्था कष्टकरी ऊस उत्पादक शेतकर्याला देणार आहे का? कोल्हापुर जिल्हयात पुर्ण एफ.आर.पी. दिली जाते. मग सांगली जिल्हयामध्ये पुर्ण एफ.आर.पी. देण्यासाठी कोण आडवे येते. यामुळे कष्टकरी शेतकरी ऊस उत्पादकाचे कोटयावधी रूपयाचे नुकसान करणारा कोणता चेहरा आहे? आपली मातृसंस्था ऊस उत्पादक शेतकर्याला पुर्ण एफ.आर.पी. का देवु शकत नाही? इस्लामपुर, साखराळे, बोरगाव व इतर करखाना लगत असणार्या गावातील नागरिकांना कारखान्याच्या काजळीचा खुप त्रास होत आहे. तो त्रास कमी कराल का? याच भागातल्या विहरीच्या किंवा बोरच्या पाण्याने पिकावु शेती खराब झाली आहे. याचे कारण आपल्या मातृसंस्थेची मळी आहे. या नुकसानीस जबाबदार कोण आहे हे आपण सांगु शकाल का? कारखान्याला लागणारे केमिकल, बारदान व इतर सर्व साहित्य अशा पध्दतीचे उद्योग धंदे तालुक्यामध्ये सुरू करण्यात आले आहेत का? त्यापैकी किती जणांना आपण संधी देवु शकला याची आपण यादी जाहिर कराल का? सहकार नियमाप्रमाणे सलग तिन वर्ष ऊस उत्पादक बिगर सभासदाने आपल्या मातृसंस्थेस ऊस पाठवला तर त्याला कायम सभासदत्व देणे कायदेशीर आहे अशा किती तालुक्यातील कष्टकरी ऊस उत्पादक शेतकर्याला सभासदत्व देवुन सन्मानित केले आहे. हे सांगाल का? दालमिया शुगर कारखाना प्रति टनाला 111किलो साखर देतो व कोणत्याही काटयावरून वजन करून आणण्यास शेतकर्याला स्वातंत्र्य देतो अशी आपली मातृसंस्था काही करणार आहे का? अशा एक ना अनेक वेदना शेतकर्यांच्या आहेत. या वेदनेवर तुम्ही फुंकर घालणार आहात का? आता या पुढे ऊस उत्पादक शेतकर्याने प्रत्येक प्रश्नासाठी व त्याला न्यायहक्क मिळविण्यासाठी न्यायालयात दाद मागावी का? याचे उत्तर आपण द्यावे. असा ही सवाल धैर्यशील मोरे यांनी शेवटी केला.
………………
COMMENTS