Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदेंची राज ठाकरेंनी घेतली भेट

मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरूवारी वर्षा या सरकारी निवासस्थानी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यास आश्‍चर्य नको ः राज ठाकरे
राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची भन्नाट नक्कल
पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून राज ठाकरे आक्रमक

मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरूवारी वर्षा या सरकारी निवासस्थानी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. दोघांची अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्यामुळे नेमकी काय खलबते झाली, यावर चर्चा झडतांना दिसून येत आहे.
गत काही महिन्यांतील दोन्ही नेत्यांतील ही सहावी भेट आहे. या भेटीचाही तपशील नेहमीप्रमाणे गुलदस्त्यात ठेवण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना मोठे उधाण आले आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर ही उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांत जवळपास अर्धा तास बंद दरवाज्याआड चर्चा झाली. त्यामुळे त्यांच्यात नेमक्या कोणत्या मुद्यावर चर्चा झाली हे कळू शकले नाही. पण ही चर्चा मराठी पाट्या व टोलनाक्यांच्या मुद्याभोवती फिरती असावी असे मानले जात आहे.

COMMENTS