Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त

फलटण / प्रतिनिधी : भाडळी, ता. फलटण येथे शनिवार, दि. 5 रोजी सर्जेराव दादा माने यांच्या मालकीच्या इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर फलटण ग्रामीण पो

कराडकरांची तहान भागविण्यासाठी डॉ. अतुल भोसले मैदानात
मायणी सशस्त्र दरोडाप्रकरणी पोलिसांची पाच पथके रवाना
जरंडेश्‍वरला भुयारी मार्गात दगडगोटे

फलटण / प्रतिनिधी : भाडळी, ता. फलटण येथे शनिवार, दि. 5 रोजी सर्जेराव दादा माने यांच्या मालकीच्या इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून 4 लाख 37 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 5 फेब्रुवारी रोजी तिनपानी पत्त्याचा जुगार पैजेवर पैसे लावून त्याचे आर्थिक फायद्याकरीता सुनील मोतीराम पवार (वय 40, रा. बुधवारपेठ, फलटण), जमन तारो पंडित (वय 32, रा. येरवडा, सादलबाबा दर्गा जवळ पुणे), योगेश यशवंत खरात (वय 34, रा. पणदरे, ता. बारामती, जि. पुणे), आतिश सुभाष साळवे (वय 24, रा. पंणदरे, ता. बारामती, जि. पुणे), सोमनाथ सिताराम घनवट (वय 39, रा. जाधववाडी, ता. फलटण), जांन्टी (रा. पंणदरे, ता. बारामती), माऊली भिवरकर (रा. फलटण), सनी काकडे (रा. फलटण), सर्जेराव दादा माने (रा. भाडळी, ता. फलटण) हे खेळत असताना एकूण 4,37,940 रुपये किमतीचे जुगाराचे साहित्यासह मिळून आले. संशयित नं.1 यांच्याकडे मो. सा. चे कागदपत्र व चालविण्याचा परवाना नसताना, सर्व संशयितांनी कोरोना साथीच्या अनुषंगाने मानवी जीवितास धोका निर्माण होईल. याबाबत माहित असतानाही या ठिकाणी मास्कचा वापर न करता कोव्हीड -19 विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पसरून व्यक्तिगत व सामाजिक सुरक्षा धोक्यात घातली. तसेच कोविड साथीचे गंभीर आजाराचा प्रसार पसरू नये म्हणून आदेशाचे पालन न करता निष्काळजीपणा करताना मिळून आले. अशी फिर्याद गणेश अवघडे यांनी दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आरगडे करत आहेत.

COMMENTS