Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींवर पाकिस्तान कनेक्शनचा आरोप

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या लंडन दौर्‍यातील भाषणादरम्यान पाकिस्तानी कमल मुनीर त्यांच्या मागे उभे असल्याचा फोटो ट्विट करत भाजपचे राष्ट्रीय प्

पायलट आणि क्रू कर्मचार्‍यांना परफ्यूम वापरण्यास बंदी
भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राच्या बड्या नेत्याला धक्काबुक्की
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर ?

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या लंडन दौर्‍यातील भाषणादरम्यान पाकिस्तानी कमल मुनीर त्यांच्या मागे उभे असल्याचा फोटो ट्विट करत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी पाकिस्तान कनेक्शनचा आरोप केलाय. तसेच ये रिश्ता क्या कहलाता है..? असे म्हणत अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत.  गेल्या काही दिवसापासून काँग्रेस नेते राहुल गांधी लंडन दौर्‍यावर आहेत.

यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका आणि आरोप करीत आहेत. यापार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी राहुल गांधींच्या लंडन येथील भाषणाचा एक फोटो ट्विट केलाय. या फोटोत राहुल भाषण करीत असताना पाकिस्तानी पॉलीसी मेकर कमल मुनीर मागे उभे आहेत. यावरुन भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. शहजाद पूनावाला यांनी दोन फोटो ट्विट करत राहुल गांधींना प्रश्‍न उपस्थित केले आहेत. ’ये रिश्ता क्या कहलाता है?’ त्यांनी पुढे लिहिले की, मणीशंकर अय्यर यांना पंतप्रधान मोदींना हटवण्यासाठी पाकिस्तानी हस्तक्षेप कसा हवा होता हे आठवते. आता राहुल गांधींना भारतात परकीय हस्तक्षेप हवा आहे. मुनीरसोबत स्टेज शेअर करत आहेत. ही व्यक्ती कोण आहे हे स्पष्ट आहे…लज्जास्पद. असे शहजाद यांनी म्हटले आहे. केंब्रिज विद्यापीठात प्र-कुलगुरू असलेले कमल मुनीर स्ट्रॅटेजी आणि पॉलिसीचे प्राध्यापकही आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींचा फोटो शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कमाल मुनीरशी संबंधित बातम्यांचे अनेक स्क्रीनशॉट शेअर केले जात आहेत. कमल मुनीर हे मुळचे पाकिस्तानी असून त्यांनी लाहोर येथील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. यानंतर ते मॅकगिल युनिव्हर्सिटी कॅनडातून पीएचडी करण्यासाठी गेले. ते सध्या केंब्रिज येथील जज बिझनेस स्कूलमध्ये प्राध्यापक, प्र-कुलगुरू तसेच विभागाचे संचालक आहेत. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी त्यांना तमगा-ए-इम्तियाजने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार पाकिस्तानी वंशाच्या एका नागरिकाला दिला जातो ज्याने जगात आपल्या क्षेत्रात स्थान मिळवले आहे.

COMMENTS