भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगचे भयानक वास्तव, एका अहवालानुसार समोर आले आहे. भारतातील वैद्यकीय महाविद्यालये रॅगींग सारख्या प्रकारात सर्वात व

भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगचे भयानक वास्तव, एका अहवालानुसार समोर आले आहे. भारतातील वैद्यकीय महाविद्यालये रॅगींग सारख्या प्रकारात सर्वात वाईट आहेत. विशेष म्हणजे यात आपल्या महाराष्ट्रात नाशिक येथे असलेले आरोग्य विद्यापीठ या वाईट कामात देशात तिसऱ्या क्रमांकावर असून सन २०२२ ते २४ या कालावधीत एकूण ६१ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. देशभरातून आलेल्या एकूण तक्रारी ३ हजार १५६ एवढ्या आहेत. त्यातील एकूण तक्रारींमध्ये ३८.६% एवढ्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत गंभीर प्रकरणांपैकी ३५% तक्रारी अतिशय गंभीर असल्याचे हा अहवाल म्हणतो.विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या एकूण मृत्यूंमध्ये ४५% प्रमाण हे रॅगिंग च्या कारणामुळे होत असल्याचे हा अहवाल म्हणतो. सोसायटी अगेन्स्ट व्हायोलन्स इन एज्युकेशन च्या मार्चमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सत्य कथन दिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या स्टेट ऑफ रॅगिंग इन इंडिया २०२२-२४ मध्ये या अहवालात प्रसिध्द करण्यात आले आहे.
राष्ट्रीय रॅगिंग विरोधी हेल्पलाइनवर नोंदवलेल्या ३ हजार १५६ तक्रारींवर आधारित या अहवालात रॅगिंगशी संबंधित ५१ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याचे उघड झाले आहे. याच कालावधीत राजस्थानमधील कोचिंग हब असलेल्या कोटा येथे नोंदवलेल्या गेलेल्या प्रकरणात ५७ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या नोंदवल्या गेल्या आहेत. याचा अर्थ, कोटा येथील कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी रॅगिंग पेक्षाही अधिक प्रमाणात मृत्यूच्या दारात ढकलले गेले, हे उघड आहे. कोवळ्या वयातील विद्यार्थी खाजगी कोचिंग क्लासेसमुळे मृत्यू ला जवळ करित असतील तर, अशा कोचिंग क्लासेसवर बंदी आणायला हवी. अहवालात तक्रारींच्या संख्येच्या आधारे संस्थांना देखील क्रमवारी देण्यात आली आहे, ज्यामध्ये नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रासारख्या विचारांचे अधिष्ठान असलेल्या राज्यासाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. नाशिक सारख्या शहरात शासकीय वैद्यकीय उच्चशिक्षण संस्था म्हणजे विद्यापीठात घडणाऱ्या या बाबीला वेळीच आवर घातला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ होत असताना विद्यापीठ यंत्रणा गपगार कशा, हा प्रश्न साहजिकच उभा राहतो.
या अहवालामुळे वैद्यकीय महाविद्यालयांमधील गंभीर संकटाकडे लक्ष वेधले गेले आहे, विशेषतः प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी. “सर्वाधिक तक्रारी असलेल्या संस्थांची नावे देण्याव्यतिरिक्त, अहवालात वैद्यकीय महाविद्यालये फ्रेशर्ससाठी धोकादायक क्षेत्र कशी राहिली आहेत, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे,” वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना”रॅगिंगमधील प्रकारात छळले जाते. रॅगिंगमुळे मृत्यूंची वाढती चिंताजनक संख्या पाहता आपल्या शैक्षणिक संस्थांमधील परिस्थितीवर गंभीर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या अहवालांमुळे संस्थात्मक उदासीनतेला तोंड देण्यासाठी चर्चा सुरू झाली पाहिजे.” संस्था आणि वसतिगृह परिसरात कोणतेही रॅगिंग होणार नाही याची खात्री करण्यासाठी, रॅगिंगविरोधी कठोर उपाययोजना जाहीर करून आणि त्याची अंमलबजावणी करून, प्रतिबंधात्मक आणि कठोर शिक्षेची तरतूद करून यावर उपाययोजना केल्या गेल्या असतानाही, असे प्रकार होणं, याची खरी जबाबदारी संस्थावर टाकणं गरजेचे आहे. रॅगिंग हा दखलपात्र गुन्हा आहे (ज्या गुन्ह्यासाठी पोलीस वॉरंटशिवाय गुन्हेगाराला अटक करू शकतात). या घृणास्पद प्रथेमुळे भारतातील अलीकडच्या काळात अनेक हुशार विद्यार्थ्यांच्या मृत्यू आणि आत्महत्या झाल्या आहेत, ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या धोक्याची गंभीर दखल घेण्यास भाग पाडले आहे आणि रॅगिंगच्या दोषींना प्रतिबंधात्मक आणि न्याय्यपणे कठोर शिक्षा देण्याची शिफारस केली आहे.
COMMENTS