Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे विद्यापीठात वर्गणी न दिल्याने राडा

पुणे/प्रतिनिधी ः विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणार्‍या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारामध्ये गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने मोठा राडा झाला

पुणे विद्यापीठात अभाविपचा जोरदार राडा
पुणे विद्यापीठाच्या बनावट पदवी प्रमाणपत्राद्वारे मिळवली नोकरी
अखेर राड्यानंतर आता विद्यापीठात सलोखा

पुणे/प्रतिनिधी ः विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणार्‍या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारामध्ये गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने मोठा राडा झाला. एका तरुणाला बेदम मारणार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या सेवक वासाहितीत रविवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी दिनेश वाल्मिकी (वय 30), प्रतिक मल्हारी (वय 23, रा. दोघे रा. विद्यापीठ सेवक वसाहत), उमेश (वय 25, रा. चिखलवाडी, ओैंध) या तिघांवर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे. या तिघांच्या मारहाणीत कृष्णा किशोर तांबोळी (वय 35, रा. विद्यापीठ सेवक वसाहत) हा जखमी झाला असून त्याने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांबोळी आणि आरोपी वाल्मिकी, मल्हारी विद्यापीठाच्या आवारातील चाळीत राहतात. गणेश उत्सव 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. या साठी विद्यापीठात सेवक चाळीत तयारी सुरू आहे. या साठी वर्गणी गोळा करण्याचे देखील काम सुरू आहे. दरम्यान, वाल्मिकी आणि मल्हारी यांनी तांबोळी यांच्याकडे गणेशोत्सवासाठी वर्गणीची मागणी केली. मात्र, तांबोळी यांनी वर्गणी देण्यास नकार दिला. सेवक वसाहतीतील मोठ्या मंडळाला वर्गणी दिली असल्याचे तांबोळी यांनी सांगितले. या मुळे रंग आल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले. वाल्मिकी, मल्हारी आणि साथीदारांनी तांबोळींना बांबूने बेदम मारहाण केली. यात तांबोळी हे जखमी झाले आहे. त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक रायकर तपास करत आहेत. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणार्‍या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारामध्ये गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने मोठा राडा झाला. एका तरुणाला बेदम मारणार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या सेवक वासाहितीत रविवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी दिनेश वाल्मिकी (वय 30), प्रतिक मल्हारी (वय 23, रा. दोघे रा. विद्यापीठ सेवक वसाहत), उमेश (वय 25, रा. चिखलवाडी, ओैंध) या तिघांवर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे. या तिघांच्या मारहाणीत कृष्णा किशोर तांबोळी (वय 35, रा. विद्यापीठ सेवक वसाहत) हा जखमी झाला असून त्याने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांबोळी आणि आरोपी वाल्मिकी, मल्हारी विद्यापीठाच्या आवारातील चाळीत राहतात. गणेश उत्सव 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. या साठी विद्यापीठात सेवक चाळीत तयारी सुरू आहे. या साठी वर्गणी गोळा करण्याचे देखील काम सुरू आहे. दरम्यान, वाल्मिकी आणि मल्हारी यांनी तांबोळी यांच्याकडे गणेशोत्सवासाठी वर्गणीची मागणी केली. मात्र, तांबोळी यांनी वर्गणी देण्यास नकार दिला. सेवक वसाहतीतील मोठ्या मंडळाला वर्गणी दिली असल्याचे तांबोळी यांनी सांगितले. या मुळे रंग आल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले. वाल्मिकी, मल्हारी आणि साथीदारांनी तांबोळींना बांबूने बेदम मारहाण केली. यात तांबोळी हे जखमी झाले आहे. त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक रायकर तपास करत आहेत.

COMMENTS