Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलाठी भरतीवर पुन्हा प्रश्‍नचिन्ह

अतिरिक्त गुण नॉर्मलायजेशनचे असल्याचा राज्य सरकारचा खुलासा

मुंबई ः राज्यात घेण्यात आलेल्या तलाठी परीक्षेवर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह उपस्थित होतांना दिसून येत आहे. तलाठी भरती परीक्षेत एका विद्यार्थ्याला 20

गुगलचे पुणे ऑफिस बॉम्बने उडवण्याची धमकी
सावत्र बापाने मुलीला नदीत ढकलले
दिल्ली-कोलकाता सामना पाहण्यासाठी पोहचले ऍपलचे सीईओ टीम कुक

मुंबई ः राज्यात घेण्यात आलेल्या तलाठी परीक्षेवर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह उपस्थित होतांना दिसून येत आहे. तलाठी भरती परीक्षेत एका विद्यार्थ्याला 200 पैकी 214 गुण मिळाल्याचे समोर आल्याने यातही घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. या निकालानंतर विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या घोटाळ्याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तर राज्य सरकारकडून सोमवारी स्पष्टीकरण देतांना ते गुण नॉर्मलायजेशचे असल्याचे म्हटले आहे.
राज्य सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, तलाठी भरती परीक्षा 2023 मध्ये 17 ऑक्टगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये 3 भागात एकूण 57 सत्रामध्ये घेण्यात आली. सदर परीक्षेस महाराष्ट्रभरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी एकूण 10 लाख 41 हजसा 713 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. सदर उमेदवारांपैकी 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. परिक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्‍न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे टीसीएस कंपनीने तीन वेळा शंकासमाधान (एकूण 149 प्रश्‍नांचे) केले. दिनांक 04 जानेवारी 2024 अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर टीसीएस कंपनीद्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रथमतः प्रसिद्ध केल्यानुसार 57 सत्रांमध्ये विचारलेल्या प्रश्‍नांच्या आधारे 57 प्रश्‍न पत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्‍नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सदर गुण सामान्यीकरण पद्धती वेबसाईटवर दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 05 जानेवारी 2024 रोजी या सामान्यीकरण केलेल्या गुणानुसार उमेदवारांना मिळालेले सामान्यीकृत गुण वेबसाईटवर तलाठी भरती पोर्टल टॅब वर प्रसिद्ध करण्यात आले. दिनांक 07 जानेवारी 2024 रोजी काही वृत्तपत्र व दूरचित्रवाहिनी माध्यमातून या सामान्यीकृत गुणाबाबत बातमी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल, तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत. त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही. सदर परीक्षा ढउड कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात व त्यामुळे सत्र संख्या अधिक असते त्या त्या वेळेला सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते. कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्‍नांची काठिण्य पातळी विचारात घेता उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावणेसाठीची ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे. गुण सामान्यीकरणची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे की रेल्वे भरती बोर्ड, एस एस सी, म्हाडा इत्यादी मध्ये नोकर भरतीसाठी यापूर्वी वापरण्यात आली आहे. सदर ’गुण सामान्यीकरण वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि परीक्षेतील या प्रक्रियेबाबत अनभिज्ञता असल्या कारणाने काही वृत्त पत्र/दूरचित्रवाणी माध्यमातून सामान्यीकरण गुणाबाबत बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. गुण सामान्य करण प्रक्रिया ही अनेक सत्रात घेतल्या जाणार्‍या परीक्षांसाठी अत्यावश्यक असल्याने कोणत्याही उमेदवारावर अन्याय न होण्यासाठी ती तलाठी भरती परीक्षेसाठी पार पाडण्यात आली असल्याचे राज्यसरकारने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

COMMENTS