Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘पुष्पा 2 चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

मुंबई प्रतिनिधी - 'पुष्पा 2' ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असून ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाशी संबंधित अपडेट्स मिळविण

धक्कादायक… कोरोनामुळे जगभरात ४५ लाख जण पडले मृत्युमुखी
नगर मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला अटक
मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना दुर्दैवी : आदित्य ठाकरे

मुंबई प्रतिनिधी – ‘पुष्पा 2’ ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असून ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाशी संबंधित अपडेट्स मिळविण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पुष्पा 1 च्या यशानंतर ‘पुष्पा 2’ साठी उत्साही असणे स्वाभाविक आहे. आता अलीकडेच ‘पुष्पा 2’च्या निर्मात्यांनी या मोस्ट अवेटेड चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’ 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट 2021 मध्ये आलेल्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटातूनच अल्लू अर्जुनला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सुपरहिट चित्रपटाचे प्रोडक्शन हाऊस असलेल्यामाइथ्री मूवी मेकर्स ने सोशल मीडियावर चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली. या घोषणेनंतर चाहते चांगलेच उत्सूक झाले आहेत.

‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक पोस्ट या वर्षाच्या सुरुवातीला शेअर करण्यात आला होता. यामध्ये तो साडी नेसलेला दिसत होता. अभिनेत्याच्या चेहऱ्यावरील मेकअप लाल आणि निळ्या रंगाने दिसत होता. तो बांगड्या, दागिने, कानातले आणि नाक पिन घातलेला दिसला. या चित्रपटातील रश्मिका मंदान्नाचा लूकही लवकरच शेअर केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, निर्मात्यांनी रश्मिकाच्या लूकआधीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यासोबतच सिंघम अगेन हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर होऊ शकते.

COMMENTS