Homeताज्या बातम्यासंपादकीय

वारकर्‍यांवर लाठीमार करण्याचे पातक…

महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा असून, शांतताप्रिय म्हणून वारकरी ओळखला जातो. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असले

नक्षलवाद्यांचा बिमोड !
लोकशाहीतील सोयीचे राजकारण
विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा

महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा असून, शांतताप्रिय म्हणून वारकरी ओळखला जातो. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय, असाच अर्थ घेतला जातो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ह्या आपल्या उपास्य दैवताच्या वारीला ह्या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहे, तितके अन्य कोणत्याही पंथाने त्याच्या उपास्य दैवताच्या वारीला दिलेले नाही.आपल्या विठ्ठलाची भक्ती करणे, आणि प्रपंच करणे, या दोनच बाबी या वारकर्‍याला माहित आहे. त्यामुळे कधी कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारा हा वारकरी संप्रदाय. राजकारणापासून कोसो दूर असणारा, या वारकर्‍यांवर पोलिसांनी लाठीमार केला. वास्तविक वारकरी काही आंदोलक नव्हते, किंवा वारकरी काही हातात दगड-गोटे घेणारे नव्हते, मग पोलिसांना वारकर्‍यांची भीती कशामुळे वाटली. पोलिसांनी बेदम लाठीमार करत, वारकर्‍यांना बदडून काढण्यामागचे कारण काय. याचा उहापोह होण्याची गरज आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याच्या पहिल्या दिवशी पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान पोलिस आणि वारकरी यांच्यात चकमक झाली. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. पालखी प्रस्थानादरम्यान मानाच्या पालख्यांनाच फक्त प्रवेश दिला जातो. याच मानाच्या दिंंड्या मंदिराच्या जवळ असतात. मात्र ऐनवेळी या दिंंडीतील मोजक्या लोकांना मंदिराच्या आत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे दिडींतील इतर वारकरी नाराज झाले. ते मंदिरात जाण्यासाठी गर्दी करत होते. याचवेळी पोलिसांमध्ये आणि दिंडीतील वारकर्‍यांमध्ये वाद झाला. आणि पोलिसांनी वारकर्‍यांवर लाठीचार्ज केला. वारकरी संवेदनशील असून, ते प्रत्येक बाब मान्य करतील, मात्र मंदिरात जाण्यासाठी त्यांना रोखण्याची गरज नव्हती. प्रशासनाकडून नियोजन करणे गरजेचे आवश्यक होते, त्यानुसार टप्प्याटप्प्याने वारकर्‍यांना मंदिरामध्ये सोडण्याची भूमिका प्रशासनाला घेता आली असती. मात्र कोणतेही नियोजन न करता, थेट वारकर्‍यांवर हल्ला चढवण्याचा सर्वच थरांतून निषेध होतांना दिसून येत आहे. दिंडीच्या प्रथेला अनेक शतकांचा इतिहास असून, मोगलांनी देखील वारकर्‍यांवर कधी हल्ला केला नाही, त्याच वारकर्‍यांवर लाठीमार करण्याचे सौजन्य पोलिसांनी दाखवल्याचा आरोप होत आहे. या पालखी सोहळ्यासाठी शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वारकर्‍यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि सुरक्षेसाठी पोलिस फाटा तैनात करण्यात आला आहे. हा वाद पोलिस आणि वारकर्‍यांमध्येच झाल्याने पोलिसांचे नियोजन चुकल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच पोलिसांनी वारकर्‍यांवर सौम्य लाठीचार्ज केल्यामुळे वारकर्‍यांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.
वारकरी हा शांतताप्रिय पंथ आहे. हिंसेला तो स्थान देत नाही.  वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय, असाच अर्थ घेतला जातो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ह्या आपल्या उपास्य दैवताच्या वारीला ह्या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहे, तितके अन्य कोणत्याही पंथाने त्याच्या उपास्य दैवताच्या वारीला दिलेले नाही. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा-म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस-श्रीविठ्ठलाची वारी  पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी ह्या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात. तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन वार्‍या प्रमुख मानल्या जातात. त्यामुळे वारकर्‍यांना समाजात मानाचे स्थान प्राप्त होते. कोणतीही आस न बाळगता, तो केवळ आपल्या विठ्ठलाच्या भक्तीपायी, ऊन, पाऊस, वारा कशाचीही चिंता न करता, घराबाहेर पडतो, आणि पायी दिंडीच्या माध्यमातून विठ्ठलाचे दर्शन घेतो. अशा या वारकर्‍यांवर लाठीमार करण्याचे पातक पोलिसांनी केले आहे, ते निषेधार्यच आहे. 

COMMENTS