Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणेकरांनी पाळला कडकडीत बंद राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा केला निषेध

खा. उदयनराजे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते सहभागी

पुणे/प्रतिनिधी ः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना केल्यानंतर राज्यात संतापाची

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचा प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत 15 रोजी जिल्हा मेळावा
भांबोऱ्यात शाळा बंदचा पालकांकडून निषेध 
निशिकांत (दादा) स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे राज्यस्तरीय नमो चषक हॉकी स्पर्धा

पुणे/प्रतिनिधी ः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना केल्यानंतर राज्यात संतापाची लाट उमटली होती. त्यानंतर भाजपचे खासदार उदयनराजे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत, महामानवांचा अवमान खवपून घेणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मंगळवारी पुण्यातील विविध पक्ष संघटनांनी कडकडीत बंद पाळला.


पुण्यातील व्यापारी त्याचप्रमाणे रिक्षा चालक, हमालपंचायत, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आदींनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळ पासून पुण्यातील रस्ते हे ओस पाहायला मिळाले. तसेच पुण्यातील सर्वात गजबजलेला परिसर असलेल्या मार्केटयार्ड परिसरात देखील शुकशुकाट पाहायला मिळाला. सकाळी 9 वाजता डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्यापासून सर्वपक्षीय मुक मोर्च्याला सुरुवात झाली. यात अनेक नेते, आमदार खासदार सहभागी झाले होते.
पुण्यातील डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास खासदार छत्रपती उदयनराजे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर निषेध रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन दादा जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, रूपाली ठोंबरे, प्रदीप देशमुख, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, विकास पासलकर, मुस्लिम मूलनिवासी मंचाचे अंजुम इनामदार सहभागी झाले. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या दिसून आली आहे. राज्यपाल कोशियारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी काळीपट्टी दंडाला बांधत निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा चित्र असलेला झेंडा आणि भगवे झेंडे घेऊन कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाल्याने भगवामय वातावरण पाहवयास मिळाले. सदर मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी निषेध मोर्चा सुरू झालेल्या डेक्कन परिसर ते लाल महाल या दरम्यान चोख बंदोबस्त तैनात केला आहे. मंगळवारी दुपारी 3 पर्यंत हा बंद पाळण्यात आला. त्यानंतर पुणे शहरातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरु झाल्याचे दिसून आले.

COMMENTS