भावी शासकीय नोकरांनी परीक्षेलाच मारली दांडी…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भावी शासकीय नोकरांनी परीक्षेलाच मारली दांडी…

एमपीएससी परीक्षेला 25 टक्के परीक्षार्थी गैरहजर

अहमदनगर/प्रतिनिधी : शासकीय नोकरीची प्रत्येक बेरोजगाराला आस असली तरी यासाठीच्या परीक्षा प्रक्रियेत तावूनसुलाखून निघण्याची तयारी अनेकजण दाखवत नाहीत. अर

अनुसुचित जाती व नवबौध्द घटाकांच्या वस्त्यांचा विकास योजनेच्या अनुदानात वाढ
Samgamner : तळेगाव दिघे मार्गावर पीकअपचा अपघात
Sangamner : जि प सदस्य सिताराम राऊत यांनी शासनाच्या निधीचा केला गैरवापर (Video)

अहमदनगर/प्रतिनिधी : शासकीय नोकरीची प्रत्येक बेरोजगाराला आस असली तरी यासाठीच्या परीक्षा प्रक्रियेत तावूनसुलाखून निघण्याची तयारी अनेकजण दाखवत नाहीत. अर्थात यामागे काही खासगी अपरिहार्य कारणेही असू शकतील. पण दोन दिवसांपूर्वी नगरला झालेल्या एमपीएससी परीक्षेला तब्बल 4 हजार 798 उमेदवारांनी मारलेली दांडी चर्चेची झाली आहे. परीक्षेस बसलेल्यांपैकी तब्बल 25 टक्के मुलांनी ही परीक्षाच देण्याचे टाळल्याने शासनाने यासाठीची केलेली तयारी वाया गेली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित, गट-ब, संयुक्त (पूर्व) परीक्षा 2022 मागील शनिवारी (26 फेब्रुवारी) जिल्ह्यातील 60 उपकेंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेस 18 हजार 636 उमेदवारांपैकी 13 हजार 928 उमेदवार हजर राहिले व या परीक्षेला 4 हजार 798 उमेदवारांनी दांडी मारल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.
एमपीएससी मार्फत दुय्यम सेवा अराजपत्रित पदासाठी एका सत्रात ही पूर्वपरीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार या परीक्षेचे काटेकोर नियोजन नगर शहरातील 60 उपकेंद्रांवर करण्यात आले होते. परीक्षेसाठी तब्बल 1 हजार 750 अधिकारी-कर्मचारी तैनात होते. सहायक केंद्र प्रमुख म्हणून महसूल शाखेच्या तहसीलदार माधुरी आंधळे यांच्याकडे जबाबदारी होती. परीक्षा केंद्र परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता. परीक्षा केंद्र परिसरात नगर प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या आदेशानुसार कलम 144 (3) जारी केले होते. या परीक्षेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व परीक्षार्थी उमेदवारांना मुखपट्टी (मास्क), हातमोजे व सॅनिटायजर जवळ बाळगणे अनिवार्य करण्यात आले होते. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. यामध्ये कोणीही विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आला नाही. दरम्यान, परीक्षा संपल्यावर एकाचवेळी विद्यार्थी बाहेर पडल्याने शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली.

COMMENTS