Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईडीचे पुणे आणि छ. संभाजीनगरमध्ये छापे

पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये 4 हजार कोटींचा घोटाळा

पुणे/छत्रपती संभाजीनगर ः महानगर पालिकेच्या हद्दीत राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाच लॅपटॉपवरून ट

विदर्भासह मराठवाड्याला पावसाने झोडपले
कडक उन्हाळ्यातही शहर वासियांना चार दिवसांनतर पाणी
विखेंचे किती वीज बिल माफ केले, मग शेतकर्‍यांची वीज का तोडता ?

पुणे/छत्रपती संभाजीनगर ः महानगर पालिकेच्या हद्दीत राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाच लॅपटॉपवरून टेंडर भरण्यात आल्याची माहिती समोर आली असून, हा घोटाळा तब्बल 4 हजार कोटींच्या जवळपास असल्यामुळे अंमलबजावणी संचालनालय अथार्र्त ईडीने शुक्रवारी पुण्यात 5 ठिकाणी तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ठिकाणी छापेमारी केली.
पंतप्रधान आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदेत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आहे. पुण्यातील महमदवाडी, येरवाडा तसेच पुणे शहरात 5 ठिकाणी ईडीची मोठी छापेमारी सुरू आहे. तर छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी सकाळी ईडीने शहरातील 9 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. ईडीच्या पथकाने शहरातील सिटी चौक पोलिसात 19 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ई निविदा प्रकरणात नियम न पाळल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. यात 40 हजार घरांसाठी 4 हजार कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट देण्याबाबत ही निविदा काढली होती. रमरथ कन्ट्रक्शन, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस या कंपन्यांनी भरलेली निविदा ही एकाच आयपीवरुन भरली. यात शासनाच्या अटीचा भंग केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
निविदा घोटाळ्यात अडकलेल्या समरथ कन्स्ट्रक्शन, इंडो ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस या कंत्राटदार कंपन्यांनी संयुक्त भागीदारीमध्ये पुणे परिसरात बांधलेल्या बहुमजली इमारतींची पाहणी करण्यासाठी महापालिकेने समिती स्थापन केली आहे. ही समिती या कंत्राटदारांनी बांधलेल्या इमारतींची पाहणी करून अहवाल सादर करणार असल्याची माहिती मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. पंतप्रधान आवास योजनेसाठी समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्रॉपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी टेंडर भरले होते. 4 हजार कोटींच्या प्रकल्पात 40 हजार घरकुलाचा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र, समरथ कन्स्ट्रक्शनने बँक गॅरंटी भरण्यास असमर्थ असल्याचे सांगितली होती. यानंतर अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर समरथ कंपनीने पडेगाव येथील घरकुल प्रकल्पासाठी बँक गॅरंटी भरली. यात चारपैकी एक कंपनी अपात्र ठरली होती.

अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता – या प्रकरणी यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलिसात 40 हजार घरांच्या जवळपास 4 हजार कोटींच्या या प्रकल्पात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. याप्रकरणी महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक-भागीदारांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS