पुणे राज्यातील सर्वांत थंड शहर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे राज्यातील सर्वांत थंड शहर

नीचांकी 13.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

पुणे प्रतिनिधी : मुंबई, ठाण्यात पहाटे वगळता थंडी ओसरली असली तरी पुणे शहरात सलग तिसर्‍या दिवशी राज्यातील नीचांकी 13.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नों

जय- पराजयापेक्षा स्पर्धेत भाग घेणे महत्वाचे ः स्नेहलता कोल्हे
फोनवर मोठ्याने बोलल्याच्या कारणावरून हॉटेलमध्ये राडा
राहुल गांधींच्या भारत-जोडो यात्रेत धक्काबुक्की

पुणे प्रतिनिधी : मुंबई, ठाण्यात पहाटे वगळता थंडी ओसरली असली तरी पुणे शहरात सलग तिसर्‍या दिवशी राज्यातील नीचांकी 13.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे शनिवारीही पुणे राज्यातील सर्वांत थंड शहर ठरले. पुणे शहर आणि परिसरात यंदाच्या हंगामात पाच वेळा राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
30 ऑक्टोबरला शहरात 12.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. यंदाच्या हंगामातील पुण्यातील हे नीचांकी तापमान ठरले. त्याच दिवशी हे तापमान राज्यातही नीचांकी होते. 3 नोव्हेंबरला 13.1 अंश सेल्सिअस राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. गुरुवारी (10 नोव्हेंबर) पुण्यात 12.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान पुन्हा राज्यातील नीचांकी तापमान ठरले. त्यानंतर शुक्रवारी 12.8 अंश सेल्सिअस राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद शहरात झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत 2.9 अंशांनी कमी होते. शनिवारी सलग तिसर्‍या दिवशीही 13.4 अंश सेल्सिअस किमान तापमान राज्यातील नीचांकी तापमान ठरले. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार रविवारपासून शहरात दुपारनंतर अंशत: ढगाळ स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात वाढ होऊ शकते. शहरात सध्या दिवसाचे कमाल तापमान 30 ते 31 अंशांच्या आसपास नोंदविले जात आहे. त्यामुळे उन्हाचा हलका चटका आहे. मात्र, कमाल तापमान काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

COMMENTS