Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई  ; १६२ दुचाकी वाहने जप्त 

पुणे प्रतिनिधी - पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी गुन्हे शाखेस वाहनचोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करुन व गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष मोहिम राबविण

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करावी
बॉलिवूड कधीच संपणार नाही, रोहित शेट्टीचं मोठं विधान | LOKNews24
राज्यात वाढणार पावसाचा जोर

पुणे प्रतिनिधी – पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी गुन्हे शाखेस वाहनचोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करुन व गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष मोहिम राबविणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मा. पोलीस सह आयुक्त व मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, यांचे देखरेखेखाली माहे मार्च २०२३ पासून गुन्हे शाखेकडील सहा पोलीस आयुक्त, गुन्हे – १ व गुन्हे – २ तसेच युनिट / पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांचेमार्फत विशेष मोहीम राबविली जात आहे. त्या अनुषंगाने विशेष मोहीमेदरम्यान गुन्हे शाखेकडील युनिट-६, युनिट-५, युनिट- ४, युनिट – २ आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – २ यांनी विशेष मोहिमेदरम्यान एकुण १७ आरोपी व १ विधीसंघर्षीत बालक यांना पकडून त्यांच्याकडून ५४,६७,०००/- रु. किं. चे एकुण १६२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त रितेशकुमार, पोलीस सह आयुक्त संदीप . कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – १, सुनिल पवार, सह पोलीस आयुक्त, गुन्हे-२, नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-६ कडील पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल, पोउनि सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, सचिन पवार, कानिफनाथ कारकिले, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, प्रतिक लाहीगुडे, प्रमोद मोहित, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे, अश्फाक मुलाणी, सुहास तांबेकर. सपोनि विशाल मोहिते, पोलीस अंमलदार मोहसिन शेख, उत्तम तारु, विनोद चव्हाण, विजय पवार, प्रमोद कोकणे, कादीर शेख, पुष्पेंद्र चव्हाण, समीर पटेल, सदरची कामगिरी ही वरील अधिकारी व अंमलदार यांनी विशेष मोहीमेदरम्यान केली आहे.

COMMENTS