Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुणे - विमानतळाला जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली. ते

विद्या बालनच्या नावाने बनवले बनावट सोशल मीडिया अकाउंट
राहुरी नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाचे काम ठप्प
भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू

पुणे – विमानतळाला जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली. ते पुणे पालखी मार्ग भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यासंबंधी सरकारला प्रस्ताव दिला होता, तो आम्ही स्वीकारला आहे, येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळेल अशी माहिती आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
नवीन विमानतळ तयार करण्यात येणार आहे, त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यायचे आहे. पंरतु पुण्यात जे विमानतळ आहे, जे नव्या पद्धतीने बनवण्यात आले आहे, त्याचे नामकरण जगदगुरू तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावे, अशीसंकल्पना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. त्यावर तात्काळ काम आम्ही सुरू केले आहे. येत्या कॅबिनेटला आम्ही तो प्रस्ताव मांडून मंजूर करून घेणार आहोत. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि नितीन गडकरी यांची असेल असेही फडणवीसांनी म्हटले आहे. जगदगुरू तुकाराम महाराजांचे नाव विमानतळाला दिले, तर त्याचा सगळ्यांना आनंद होईल, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

COMMENTS