Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सार्वजनिक स्वच्छता हा दिनचर्येचा भाग झाला पाहिजे : विमल पुंडे

योग प्रचार संस्थेच्या स्वच्छता अभियानात महिलांचा लक्षणीय सहभाग

कोपरगाव प्रतिनीधी- वयक्तिक स्वच्छते बरोबरच सार्वजनिक स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाने महत्वाची समजली पाहिजे. त्यातूनच निरोगी समाज उभा राहिल. हाच स

खून झालेल्या महिलेवर अत्याचार ? व्हिसेरा ठेवला राखून
Sangamner : कोविडचे नियमच तहसीलदार अमोल निकम यांनी बसवले धाब्यावर (Video)
श्री जगदंबा देवीच्या पालखी सोहळ्यास लाखोंची गर्दी

कोपरगाव प्रतिनीधी- वयक्तिक स्वच्छते बरोबरच सार्वजनिक स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाने महत्वाची समजली पाहिजे. त्यातूनच निरोगी समाज उभा राहिल. हाच समाज समृद्ध भारत घडवण्यासाठी सर्वात पुढे असेल. असे प्रतिपादन योग शिक्षिका विमलताई पुंडे यांनी स्वच्छता अभियानात केले. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता अभियानात सहभाग म्हणून योग संस्थेच्या वतीने अभियान राबविण्यात आले. गोदावरी नदीच्या घाट परिसरात मोठ्या प्रमाणात महिलांनी या स्वचछतेची औजारे सोबत आणून अभियानात भाग घेतला. सदरचा परिसर नियमित स्वच्छ ठेवण्यासाठी हा उपक्रम नियमित राबविण्याचा संकल्प महिलांनी केला. या अभियानात योग शिक्षिका विमल पुंडे, दत्ता पुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुष्पाताई जगताप, सुमित्रा कुलकर्णी, गिरीशा कदम, रुपाली महाडिक, रंजना नाईकवाडे, कमलताई नरोडे, शोभा कानडे, सुप्रिया निळेकर, उषाताई सोनवणे, ताराबाई सोनवणे, वैशाली दिवेकर, सुजाता कोपरे, रत्नाताई पवार, कविता दरपेल, उर्मिला लोळगे, कविता साळुंखे, कल्पना सोनवणे, रोहिणी पुंडे, सुनीता भुतडा, कविता शहा, धनश्री देवरे, रोहिणी गांगुर्डे, कल्पना मोरे, पूजा देवळालीकर, योगिता साळी, राधिका जाधव, उषाताई शिंदे, अलका भावसार, शितल नाईक , रेखा खंडागळे आदी अनेक महिलांनी या अभियानात श्रमदान करत सहभाग नोंदविला.

COMMENTS