कोपरगाव : तालुक्यात वाळूचोरीविरोधी पथकांनी गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन व वाहतूक करताना जप्त केलेल्या वाहनांबाबत दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र संबंधित वाहनमालकांनी आदेशानुसार शासनाकडे दंडाची रक्कम जमा न केल्याने ही वाहने जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याअनुषंगाने सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, कोपरगाव येथे जप्त वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावातून मिळणाऱ्या रकमेच्या माध्यमातून संबंधित प्रकरणांतील दंडाची वसुली करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांनी लिलावाच्या अटी-शर्ती, उपलब्ध वाहने तसेच हातची किंमत आदींबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत तहसील कार्यालय, कोपरगाव येथील गौण खनिज शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती तहसील कार्यालय, कोपरगाव येथील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आल्याचेही प्रशासनाने कळविले आहे.

कोपरगाव : तालुक्यात वाळूचोरीविरोधी पथकांनी गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन व वाहतूक करताना जप्त केलेल्या वाहनांबाबत दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र संबंधित वाहनमालकांनी आदेशानुसार शासनाकडे दंडाची रक्कम जमा न केल्याने ही वाहने जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
याअनुषंगाने सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, कोपरगाव येथे जप्त वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावातून मिळणाऱ्या रकमेच्या माध्यमातून संबंधित प्रकरणांतील दंडाची वसुली करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांनी लिलावाच्या अटी-शर्ती, उपलब्ध वाहने तसेच हातची किंमत आदींबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत तहसील कार्यालय, कोपरगाव येथील गौण खनिज शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.
यासंदर्भातील सविस्तर माहिती तहसील कार्यालय, कोपरगाव येथील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आल्याचेही प्रशासनाने कळविले आहे.

COMMENTS