Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेत दिव्यांग कर्मचारी, अधिकारी यांच्या समस्यांविषयी बैठक संपन्न

दिव्यांग कर्मचारी, अधिकारी यांच्या समस्यांचे निराकारण त्वरित करा – मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल

नाशिक : जिल्हा परिषदेतील दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांच्या अडचणी व समस्यांसंदर्भात आज बैठक पार पडली. जिल्हा परिषदेच्या कै. कर्मवीर रावसाहेब थोर

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ?
आपले किल्ले आपली जबाबदारी : समीर शेख
शिंदे-फडणवीस दररोज १८-१८ तास काम करतात 

नाशिक : जिल्हा परिषदेतील दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांच्या अडचणी व समस्यांसंदर्भात आज बैठक पार पडली. जिल्हा परिषदेच्या कै. कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. प्रास्ताविकात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. १३ मार्च २०२३ रोजी घेण्यात आलेल्या बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन करून कार्यवृत्तांत सादर केला. दिव्यांग कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी व दिव्यांग कर्मचारी यांनी यावेळी अधिकारी व कर्मचारी यांच्या अडचणी व समस्या मांडल्या यातील प्रत्येक समस्येचे निराकारण हे लवकरात लवकर करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.

दि. ७ फेब्रुवारी १९९६ पासून पदांची परिगणणा करून शिक्षण विभाग (प्राथमिक)/आरोग्य विभाग यांनी दिव्यांगांचा ४% पदोन्नतीचा अनुशेष न भरल्या बाबत सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दि. ८ सप्टेंबर २००८ आणि २० एप्रिल २०२३ च्या अनुषंगाने कारवाई करावी, दिव्यांगाच्या वैदयकिय प्रमाणपत्राच्या दिनांकापासून दिव्यांगाची स्वंतत्र दिव्यांग प्रवर्ग निहाय सेवाजेष्ठता सूची तयार करणे, दिव्यांग कर्मचारी /अधिकारी यांना शासनाचे लाभ घेणेसाठी युडीआयडी कार्ड बंधनकारक करणे, प्रलंबित असलेले दिव्यांग वाहतुक भत्याची प्रकरणे निकाली काढणे दिव्यांग कर्मचारी अधिकारी यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे तसेच स्कूटर विथ अॅडप्शनसह उपलब्ध करुन देणे, दिव्यांग कर्मचारी अधिकारी यांच्या वाहतूक भत्तयाची नोंद सेवापुस्तीकेत घेणे, दिव्यांग कर्मचारी अधिकारी यांच्या बदल्या त्यांच्या विनंती अर्जानुसार सोयीच्या ठिकाणी करणेबाबत याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रदीप चौधरी, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, कृषि विकास अधिकारी कैलास शिरसाठ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग १ संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग २ पंकज मेतकर, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग ३  शैलजा नलावडे, यांच्यासह दिव्यांग अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.

COMMENTS