Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव मतदारसंघासाठी साडेपाचशे कोटीहून अधिक निधीची तरतूद – कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी ः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शिर्डी

वासुदेव देसले यांची उपविभागीय पोलिस अधिकारी पदी पदोन्नती
विद्यानिकेतन अ‍ॅकेडमीत विद्यार्थी परिषदेची निवडणूक उत्साहात
नितीन गडकरी व शरद पवार येणार एकाच मंचावर.. ४ हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ

कोपरगाव प्रतिनिधी ः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शिर्डी विमानतळावर नवे सुसज्ज प्रवासी टर्मिनल उभारण्यासाठी 527 कोटी तर मतदारसंघातील विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांसाठी 25.50 कोटी अशा एकूण साडेपाचशे कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केली आहे. याबद्दल भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मतदारसंघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कार्यक्रमांसाठी शनिवारी कर्जत (जि. अहमदनगर) दौर्‍यावर आले होते. याप्रसंगी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध कामांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात साडेपाचशे कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी यावेळी फडणवीस यांचा सत्कार करून मतदारसंघातील जनतेच्या वतीने त्यांना धन्यवाद दिले. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा सन 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला. अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प शाश्‍वत शेती-समृद्ध शेतकरी महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास या पाच ध्येयावर आधारित आणि सर्वांना न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल  स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे शेतकर्‍यांच्या वतीने आभार मानले. या अर्थसंकल्पात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी 25.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. चास-वडगाव-बक्तरपूर जिल्हा हद्द रस्ता (प्र.जि.मा.08) रा.मा. 65 (कोपरगाव ते धारणगाव रस्ता), रा. मा.07 धामोरी, येसगाव रस्ता (प्र.जि.मा.04) येसगाव-खिर्डी गणेश-बोलकी रस्ता सुधारणा करणे (4 कोटी), बक्तरपूर जिल्हा हद्द रस्ता (प्र.जि.मा.08), (मंजूर गाव ते बक्तरपूर रस्ता), रा.मा.65 अंजनापूर ते रांजणगाव देशमुख रस्ता, उक्कडगाव रस्ता रा.मा.65 (करंजी फाटा ते कॅनॉलपर्यंत रस्ता) मध्ये सुधारणा, रा.म.मा.50 (रा.मा.36) शिंगवे ते बनकर वस्ती रस्ता सुधारणा, रामपूर वाडी ते पुणतांबा रस्ता (प्रजिमा 87) मध्ये सुधारणा, रा.मा. 7 रस्ता (प्रजिमा 85) सा. क्र.0/500 मध्ये कुंभारी येथील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी या अर्थसंकल्पात 25.50 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून आता मतदारसंघातील अनेक महत्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याने गेल्या काही वर्षांपासून खराब रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव मतदारसंघाला ही अनोखी भेट दिली असल्याचे स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.

COMMENTS