Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फटा ऑर्डीनन्स और आउट हो गया राहुल म्हणत भाजपा कार्यकर्त्यांची राहूल गांधीविरोधात निदर्शने

नांदेड प्रतिनिधी - राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याचा येवला भाजपाच्या वतीने त्यांची निषेध करण्यात आला. राहूल गांधीविरोधा

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर’ 266 रुपयांनी महागले
धावत्‍या बसवर कोसळले झाड; बारा प्रवासी जखमी
 बुलढाण्यात भाजप कडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत केली निदर्शने 

नांदेड प्रतिनिधी – राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याचा येवला भाजपाच्या वतीने त्यांची निषेध करण्यात आला. राहूल गांधीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. दोन वर्ष शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधीचे लोकप्रतिनिधित्व रद्द होऊ नये म्हणून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ऑर्डीनन्स आणला असता. त्यामुळे अचानक पणे पत्रकार परिषेदेत येऊन हिरो होण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधींनी स्वतःच्या पंतप्रधानाचा अध्यादेश फाडून टाकून कम्प्लेटली नॉन्सेन्स अशा शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे आज त्यांना याची फळ भोगावी लागत आहेत. राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाल्यामुळे लोकसेवेच्या कार्यालयाने त्यांची खासदारकी रद्द केली आहे आहे. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या, कायदा न मानणाऱ्या, संविधानाचे अवहेलना करणाऱ्या या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना समजलं पाहिजे की लोकशाही कुठेही गेली नसून लोकशाही इथेच आहे. लालूप्रसाद यादवांना याच कायद्याचा आधार मिळणार होता. तेव्हा चोर लोक ही जेल मध्ये गेली पाहिजे. असा आग्रह करणाऱ्या आणि स्वतःला निष्कलंक समजणाऱ्या राहुल गांधी यांनी ऑर्डीनन्स फाडल्यामुळे आज त्यांना जेल मध्ये टाकण्यात आले, असे प्रवीण साले यावेळी म्हणाले.

COMMENTS