मुंबई प्रतिनिधी - मातृत्वाचा झरा बनून लाखो अनाथ लेकरांची आई झालेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित ही मालिका ‘सिंधुताई माझी माई-गोष्ट

मुंबई प्रतिनिधी – मातृत्वाचा झरा बनून लाखो अनाथ लेकरांची आई झालेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित ही मालिका ‘सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीची’असणार असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री प्रिया बेर्डे तब्बल 7 वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. ‘सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीची’ या मालिकेत अभिनेत्री प्रिया बेर्डे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत त्या पार्वती साठे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. छोट्या पडदा गाजवणारा किरण माने या मालिकेत अभिमान साठे म्हणजेच चिंधीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर चिंधीची आई म्हणजेच हिरु साठेच्या भूमिकेत अभिनेत्री योगिनी चौक दिसणार आहे. तसेच प्रिया बेर्डे या मालिकेत चिंधीच्या आजीच्या म्हणजेच पार्वती साठेच्या भूमिकेत दिसणार आहे
COMMENTS