खाजगी पेट्रोलियम कंपन्यांचा देशहिताकडे कानाडोळा !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

खाजगी पेट्रोलियम कंपन्यांचा देशहिताकडे कानाडोळा !

रशिया आणि युक्रेन युद्धात सारे जग रशियाच्या एकूणच धोरणावर टीका करीत असताना आणि रशियाकडून कुठल्याही वस्तूंची खरेदी करण्यास नकार देत असताना, भारताचे खा

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ
अपघातात कार चालक गंभीर जखमी
पीएमपीएमएल बसचे सीनजीएमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय

रशिया आणि युक्रेन युद्धात सारे जग रशियाच्या एकूणच धोरणावर टीका करीत असताना आणि रशियाकडून कुठल्याही वस्तूंची खरेदी करण्यास नकार देत असताना, भारताचे खाजगी उद्योजक मात्र रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करीत आहेत. रशियाकडून काही प्रमाणात किंमतीत सुट मिळत असल्यामुळे, अशा प्रकारची खरेदी भारतातील खाजगी उद्योजकांनी – खास करून रिलायन्स आणि नायरा – या दोन पेट्रोलियम उद्योगांनी या संदर्भात मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या दोन्ही उद्योगांनी रशियाकडून खरेदी केलेल्या तेलाला देशातील बाजारपेठेत उपलब्ध न करता ती पुन्हा निर्यात करून नफा मिळवला आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत इंधनाचा तुटवडा हा कृत्रिमपणे निर्माण झालेला आहे. त्याच वेळी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या कडून दोन देशांच्या आयात-निर्यात धोरणानुसार खरेदी केलेले तेल हे खाजगी पेट्रोलियम कंपन्यांच्या तुलनेत अत्यल्प आहे परंतु त्याच वेळी खाजगी कंपन्यांनी देशांतर्गत पेट्रोल पंप यांना होणारा पुरवठा जवळपास थांबवला आहे याचे कारण देशांतर्गत इंधन तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे खाजगी पेट्रोलियम उद्योजक आपला माल देशांतर्गत सप्लाय करीत नाहीये. रशियाने यूक्रेन बरोबर युद्ध छेडल्यापासून आतापर्यंत जवळपास साडे ६२ मिलियन बॅरल्स तेलाची आयात भारतात झाली असून, यातील खूप मोठा हिस्सा हा केवळ रिलायन्स आणि नायरा या दोन पेट्रोलियम कंपन्यांचा आहे. सन २०२१ च्या आयातीची तुलना करता ही आयात तीन पटींनी जास्त आहे. त्याचप्रमाणे रशियाकडून आयात केलेले हे तेल रिलायन्स आणि नायरा या दोन भारतीय खाजगी पेट्रोलियम कंपन्या युरोपीय आणि इतर देशांना निर्यात करीत आहेत. रशियाने युद्ध सुरू केल्यापासून च्या काळात या तेलाची होणारी निर्यात ही पंधरा टक्क्यांनी अधिक आहे, असे आता एकूणच आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्याच वेळी खासगी इंधन पुरवठा कंपन्यांनी देशी बाजारपेठेतील त्यांचा इंधन पुरवठा जवळपास दहा टक्‍क्‍यांनी कमी करून घेतला आहे. याचाच अर्थ, देशातील ग्राहकांना इंधन तेल उपलब्ध करून देण्यास खाजगी पेट्रोलियम कंपन्या अनुत्सुक आहेत. देशातील इंधन तेलाचे साठा आणि वितरण सर्वाधिक करणारी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन च्या सेक्युरिटी चे ग्रीटिंग काय खाजगी बँकांनी कमी केले आहे मात्र त्याच वेळी रिलायन्स पेट्रोलियमला पर्यायी इंधन तेल पुरवठा दाराचा दर्जा या खाजगी बँकांनी देऊ केला आहे. पश्चिम भारतात म्हणजे गुजरात मधील जामनगर येथे पेट्रोल थ्री फायटिंगचा प्लांट असणाऱ्या रिलायन्स ने आता धोरण बदलले असून, सवलतीच्या दरातील इंधन आयात करणे आणि तेच इंधन इतर देशांना पुरवठा करणे, यामुळे देशी ग्राहकांना मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि त्याच वेळी सार्वजनिक कंपन्यांच्या एकूणच आयात-निर्यात धोरणावरही परिणाम होऊन तोट्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. रशियातून आयात केलेल्या क्रुड ऑईल वर प्रक्रिया करून तेच तेल निर्यात करण्यातून जवळपास प्रति बॅरेल आम्हाला $30 (डॉलर) पेक्षाही अधिक नफा मिळतो आहे, असे खाजगी पेट्रोलियम वितरकांच्या एका सूत्राने सांगितल्याचे आता बाहेर आले आहे. सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांनी सध्याचा काळ आमच्यासाठी अतिशय कठीण असल्याचे सांगत देशांतर्गत ग्राहकांची गरज पूर्ण करीत असताना त्यातून नफा कमीत कमी मिळवण्याचा प्रयत्न हे मोठे जिकिरीचे झाले असल्याचे म्हटले आहे.
हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर देशांतर्गत ग्राहक आणि त्याला कोणत्याही वस्तूचा पुरवठा करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक कंपन्यांवर जितकी नैतिक पातळीवर सोपवलेली असते, तितकेच खाजगी क्षेत्राने नैतिक पातळी सोडलेली असते, परिणामी देशांतर्गत ग्राहकांची ससेहोलपट होत असते आणि त्याचबरोबर महागाईचा सुद्धा त्यांना सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो.

COMMENTS