Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लालपरी जागी खासगी गाड्या फलाटावर; सांगली जिल्ह्यातील प्रकाराने महामंडळाचे वाभाडे

सांगली / प्रतिनिधी : एसटी आगाराचा ताबा घेतला असून खासगी गाड्यांनी पोलीस बंदोबस्तात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा फलाटावर

धर्म सत्कर्माने व्यक्त व्हावा !
वारीत दशावतारी आखाडीचे आयोजन
पूरग्रस्तांना वन बुलढाणा मिशनचा मदतीचा हात 

सांगली / प्रतिनिधी : एसटी आगाराचा ताबा घेतला असून खासगी गाड्यांनी पोलीस बंदोबस्तात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा फलाटावर लागल्या काळी-पिवळी टॅक्सी, जीप प्रवासी वाहतुकीस सज्ज झाल्या. सांगली-एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे विविध आगारांचे बसस्थानक काही दिवसापासून ओस पडले आहेत. गृह विभागाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बसस्थानकातून खासगी प्रवासी बसेस, स्कूल बस, मालवाहू वाहने आदींना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सांगलीत आज खासगी बसेस, काळी-पिवळी टॅक्सी आदी गाड्यांनी बसस्थानकाचा ताबा घेतला. एसटीच्या फलाटावर काळी-पिवळी जीप लागल्याचे चित्र पहिल्यांदा दिसून आले.
एसटीचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्यात गेल्या काही दिवसापासून कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. कृती समितीने देखील संपात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटीचे चाक जागेवरच थांबले आहे. सांगली जिल्ह्यात 4 हजार 700 कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. दैनंदिन 1366 फेर्‍या रद्द झाल्या आहेत. ऐन दिवाळी सणासुदीच्या काळात गावाकडे परतणार्‍या प्रवाशांची आणि नियमित प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. राज्यात सर्वत्र हीच परिस्थिती आहे.
दरम्यान, गृह विभागांनी अधिसूचना काढून मोटार वाहन अधिनियमातील कलमानुसार खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या बसेस आदी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे. आदेशानुसार आज सकाळपासून सांगलीतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या फलाटावर 35 काळी-पिवळी टॅक्सी लावण्यात आल्या आहेत. पोलीस बंदोबस्तात ही प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दूरवरच्या प्रवासासाठी बसेसही दाखल झाल्या आहेत.
सांगलीतून जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. कोल्हापूर, सातारा, पुणेसह प्रमुख मार्गावर या गाड्या उपलब्ध होतील त्याप्रमाणे सुरू केल्या जातील. सांगलीसह विविध आगारात या खासगी गाड्या तैनात केल्या आहेत. एसटीच्या तिकिटाप्रमाणे यांना दर आकारण्याबाबत सूचना दिल्या आहेत. दोन दिवसापूर्वी खासगी तत्वावरील शिवशाही गाड्या भाजपने अडवल्या होत्या. त्यामुळे या खासगी गाड्या अडवल्या जाऊ नयेत म्हणून सांगलीत पोलीस बंदोबस्तात या गाड्या रवाना करण्यात आल्या. सांगली जिल्ह्यात एकूण एक हजारहून अधिक काळ्या-पिवळ्या टॅक्सी आहेत.
खासगी प्रवाशी वाहतूक आगारातून सुरु असताना शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, पोलीस उपनिरीक्षक दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत बंदोबस्त ठेवला आहे. तसेच आरटीओ उपनिरीक्षक प्रशांत इंगवले, किरण धुमाळ, गजानन कोळी, अश्‍विनी चव्हाण, नेहा विधाते, नंदा बारकोटे आदींसह काळी पिवळी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मजगे व पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS