Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजीनगरमध्ये दानवे विरुद्ध खैरे दिलजमाई

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर येथे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात सुरू असलेली धुसफूस संपली आहे. चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करणार नाही अशी

मराठा आंदोलनाची धग कायम
महाविकास आघाडीच्या काळात असे काहीही घडले नाही –  माजी गृहमंत्री दिलीप वळसे 
 समृद्धी महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; एक ठार

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर येथे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात सुरू असलेली धुसफूस संपली आहे. चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेणारे आणि भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असलेले अंबादास दानवे यांनी आज चंद्रकांत खैरे यांची भेट घेत त्यांना पेढा भरवून दोघांच्या वादाला पूर्ण विराम दिला आहे. खैरे यांना दानवे यांनी निवडणुकीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
छत्रपती संभाजी नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दानवे विरुद्ध खैरे वादामुळे उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली होती. दोघेही लोकसभा निवडणुक लढण्यासाठी इच्छुक होते. दरम्यान, पक्षाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्याने दानवे हे नाराज होते. दरम्यान, त्यांनी खैरे यांचा प्रचार न करता केवळ पक्षाचे काम करू अशी भूमिका घेतली. त्यामुळे दोघांचा वाद हा चव्हाट्यावर आला होता. दरम्यान, अंबादास दानवे यांनी माघार घेत आज खैरेंची यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करत त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देत पेढा भरवला. तसेच खैरे यांना शाल आणि बुके देखील भेट देत दोघांमधील वाद संपवला. छत्रपती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अंबादास दानवे हे गेल्या काही वर्षांपासून इच्छुक आहेत. मात्र, त्यांना ही संधी अद्याप मिळालेली नाही. चंद्रकांत खैरे हे संधी देत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला होता.

COMMENTS