प्राथमिक शिक्षक बँक बिनविरोध?…इब्टाने घेतला पुढाकार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राथमिक शिक्षक बँक बिनविरोध?…इब्टाने घेतला पुढाकार

अन्य मंडळांच्या प्रतिसादावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून

अहमदनगर/प्रतिनिधी : वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपासह धावून जाणे वा अंडी फेकण्यासारखे प्रकार करून राज्यभर गाजणार्‍या नगर जिल्हा प्

बालमजुरी प्रथेविरोधात एकत्र या : मंत्री हसन मुश्रीफ
जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याची सुरू झाली चौकशी ; मागील पाच वर्षांची होणार तपासणी, 102 कोटीच्या गैरव्यवहाराचा संशय
डॉ. शशांक कुलकर्णी नीती आयोगाचे कृषी सल्लागार

अहमदनगर/प्रतिनिधी : वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपासह धावून जाणे वा अंडी फेकण्यासारखे प्रकार करून राज्यभर गाजणार्‍या नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची यंदाची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अर्थात यासाठी इब्टा या शिक्षक संघटनेने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना अन्य शिक्षक संघटना व मंडळे कितपत प्रतिसाद देतात, यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. सभासदांच्या हितासाठी प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ’इब्टा’ (आदर्श बहुजन शिक्षक संघ) संघटनेने पुढाकार घेतला असून, बिनविरोध होणार्‍या निवडणुकीमुळे प्राथमिक शिक्षक बँकेची राज्यात प्रतिष्ठा वाढणार असल्याचा दावा इब्टाचे राज्याध्यक्ष उत्तरेश्‍वर मोहोळकर यांनी व्यक्त केला आहे. इतर प्राथमिक शिक्षक संघटनांची भेट घेऊन बिनविरोधसाठी चर्चा करणार आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास निवडणुकीत होणारा खर्च टाळला जाईल याचबरोबर समाजामध्ये शिक्षकाची प्रतिमा मलीन होणार नाही. सभासदांच्या हितासाठी जर बँक बिनविरोध होत असेल तर आम्ही निवडणूक रिंगणातून बाहेर जाऊ, असेही मोहोळकर यांच्यासह उपाध्यक्ष आबा लोंढे, राज्य कार्यकारणी सदस्य रमेश सोनवणे यांनी स्पष्ट केले.
शिक्षक बँकेची निवडणूक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच निवडणुकीत खर्‍याखोट्या आरोपांमुळे शिक्षकांची पात्रता खालावते. तसेच बँकेचा कारभार काटकसरीने होण्यासाठी निवडणुकांमध्ये होणारा खर्च टाळणे गरजेचे आहे. निवडणुकीत होणार्‍या वारेमाप खर्चामुळे सर्वांनाच याचा भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे सर्व मंडळांनी कमी खर्चात निवडणूक करावी अन्यथा सर्व मंडळांनी एकत्रित येऊन निवडणूक बिनविरोध करावी, असेही इब्टाने सुचवले आहे. ज्यांना शिक्षक बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे वाटते, त्या सर्व मंडख व संघटनांनी एकत्रित यावे व ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

COMMENTS