Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवीन तलाठी कार्यालयांचे प्रस्ताव तयार करा

आमदार आशुतोष काळेंच्या प्रशासनाला सूचना

कोपरगाव ः वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तलाठी कार्यालयांच्या नुतनीकरणाचा प्रश्‍न निकाली काढतांना मतदार संघा

आर.डी.एस.एसच्या मीटिंगमध्ये कोपरगावच्या उर्जा विभागाच्या कामांचा समावेश करा
कारणे देवू नका, कामे तातडीने पूर्ण करा ; आ.आशुतोष काळेंची ठेकेदार अधिकार्‍यांना तंबी
चासनळी, हंडेवाडी व कुंभारीत विकासकामांचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन

कोपरगाव ः वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तलाठी कार्यालयांच्या नुतनीकरणाचा प्रश्‍न निकाली काढतांना मतदार संघातील 25 तलाठी कार्यालयांना 6 कोटी 52 लाख निधी दिला आहे. कोकमठाण मंडल कार्यालयाच्या इमारतीचे व कोळपेवाडी, मुर्शतपूर, जेऊर पाटोदा, वेळापूर, बहादरपूर, कान्हेगावसाठी नवीन तलाठी कार्यालयाची नागरिकांची मागणी असून या कार्यालयांचे तातडीने  प्रस्ताव तयार करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.
          महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाचा कणा असलेले तलाठी कार्यालय हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मिनी तहसील कार्यालय असून मतदार संघातील या मिनी तहसील कार्यालयांच्या  इमारतींची मागील अनेक वर्षापासून दुरावस्था झाली होती.एका तलाठी कार्यालयात जवळपास चार गावांचा कारभार, शेती संदर्भातील सर्व दस्ताऐवज व नोंदी या तलाठी कार्यालयातच  असल्यामुळे ग्रामीण भागातील या तलाठी कार्यालयात नागरिकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. परंतु या तलाठी कार्यालयांच्या इमारती जुन्या झाल्यामुळे तलाठी व सबंधित महसूल प्रशासनाच्या कर्मचार्‍यांना काम करण्यात येणार्‍या अडचणी व तलाठी कार्यालयात काम घेवून येणार्‍या सर्व सामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या निधीतून अनेक तलाठी कार्यालयांची कामे सध्या प्रगतीपथावर असून काही गावातील तलाठी कार्यालयाच्या इमारतींची कामे लवकरच सुरू होणार आहे. मतदार संघातील कोकमठाण,कोळपेवाडी मंडलाधिकारी कार्यालयाची देखील इमारत जुनी झाली आहे तसेच मुर्शतपूर, जेऊर पाटोदा, वेळापूर, बहादरपुर, कान्हेगाव आदी ठिकाणी तलाठी कार्यालय व्हावे अशी नागरिकांची इच्छा आहे.त्यामुळे महसुल प्रशासनाच्या कारभाराला गती मिळून नागरिकांना येणार्‍या अडचणी कायमच्या दूर होणार आहे. त्यासाठी तातडीने कोकमठाण मंडलाधिकारी कार्यालय व कोळपेवाडी, मुर्शतपूर, जेऊर पाटोदा, वेळापूर, बहादरपूर, कान्हेगाव या तलाठी कार्यालयाच्या नूतन इमारतींचे प्रस्ताव तयार करा, अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

COMMENTS